करकंब पंचायत समितीच्या निवडणुकीत काकांना काकांची साथ......!
करकंब प्रतिनिधी: करकंब जिल्हा परिषद गटात व पंचायत समिती गणात विशेषता करकंब पंचायत समिती गणाच्या निवडणुकीसाठी आत्तापासूनच जोरात तयारी सुरू आहे. अवघ्या काही दिवसावर येऊन ठेवलेल्या या निवडणुकीमध्ये सर्वपरिचित असलेले आणि नुकत्याच पार पडलेल्या गतवर्षीच्या ग्रामपंचायत निवडणूक लढवलेले काका या नावाने सर्वांना सर्व परिचित असलेले दिलीप उर्फ काका व्यवहारे हेही आता करकंब पंचायत समिती गणातून निवडणूक लढविणार असल्याचे खात्रीलायक वृत्त हाती आले असून त्यानुसार मोठ्या प्रमाणात या दृष्टीने निवडणुकीच्या हालचालींना वेग आला आहे. त्यातच करकंब ग्रामपंचायतचे विरोधी पक्षनेते असलेले काकांची साथ.........! या निवडणुकीत मिळणारअसल्याची चर्चा ही सुरू आहे. विरोधी पक्षनेते राहुल उर्फ काका पूरवत . यांचेही प्राबल्य या पंचायत समिती गणात सर्वसामान्य लोकांच्या माध्यमातून मोठे असल्याने त्यादृष्टीने एका काका चा फायदा दिलीप काकांना काकांना या पंचायत समिती गणात निश्चितच होणार असून त्यातच करकंब मध्ये सध्या असलेल्या अंतर्गत असलेल्या नाराजीचा प्रचंड फटका आणि गेल्या वर्षभरात मिळालेल्या वागणुकीतून अनेकांनी चांगलाच बोध घेतला आहे. आता बरेच जण सावध होऊन व सावध पवित्रा घेऊन अशा मंडळींची साथ ही या करकंब पंचायत समिती गणात दिलीप उर्फ काका व्यवहारे येणार असल्याचे बोलले जात आहे. असे असले तरी दिलीप काका व्यवहारे हे गटाच्या माध्यमातून काम करण्याची भूमिका घेतात.सतत हसतमुख आणि संयमी, व कामासाठी झटणारा काका म्हणून सर्व स्तरातून त्यांना पंचायत समिती निवडणुकीत त्यांचा विचार या निवडणुकीच्या निमित्ताने होईल का? या बाबत राजकीय वर्तुळातून चर्चा केली जात आहे.