Type Here to Get Search Results !

१५ व्या वित्त आयोगाची निधीत लाखोचा भ्रष्टाचार नऊ ग्रामपंचायत सदस्यांची गटविकास अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार

१५ व्या वित्त आयोगाची निधीत लाखोचा भ्रष्टाचार नऊ ग्रामपंचायत सदस्यांची गटविकास अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार

फुलसावंगी प्रतिनिधी :- संजय जाधव 

सर्वात मोठी १७ सदस्य असलेल्या फुलसावंगी ग्रामपंचायत मध्ये आपसी अंतर्गत कलहामुळे पंधराव्या वित्त आयोगातील खर्च केलेल्या निधीतील भ्रष्टाचार चहाटाययावर आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था बळकटी करणासाठी वित्त आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायत ला देण्यात येतो ग्रामपंचायत चा कारभार पारदर्शक होण्याकरिता महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमानुसार प्रत्येक महिन्याला सरपंचानी मासिक सभा बोलावून त्या सभेचे कामकाज नोटीस वरील विषयानुसार चालविणे आवश्यक असते तसेच सदर कामकाजाचे प्रोसेनडिंग तयार करून च सदस्यांना विश्वासात घेऊन काम करणे आवश्यक असते परंतु सरपंच आणि सचिव हे प्रोसेनडिंग स्वतः च तयार करून त्यांचे हिताचे दृष्टीने सदर सदस्यांना विश्वासात न घेता ठराव घेतात जमा खर्चाचे वाचन न करता परस्पर देयके काढतात. पंधरा व्या वित्त आयोगातून परस्पर इस्टिमेट सदस्यांना विश्वासात न घेता तयार करून कामे न करताच देयके काढतात पूर्वी असलेल्या पाईपलाईन वरुन च म्हणजे जुन्याच पाईपलाईन वर देयके काढण्यात आली गावातील हातपंप व पाईपलाईन जुन्या नालीचे बांधकाम बोरवेल यांची कामे न करताच बोगस देयके काढल्याचा ठपका या नऊ सदस्यांनी सरपंच आणि सचिवांवर ठेवला आहे. सरपंच आणि सचिव संगमत करून लाखो रुपयांची देयके काढली आहेत सदस्यांना किंवा सार्वजनिक ठिकाणी माहिती न देता दोघेच जणे परस्पर ठराव घेऊन कामे न करता देयके काढली ग्रामपंचायत कार्यालयात सर्व सदस्य नागरिक उपस्थित असतांना एखाद्या मर्जीतील ठेकेदार किंवा सदस्य यांचे काही काम असल्यास सभागृहात उलगडा न करता त्याला मागच्या खोलीत नेऊन सरपंच आणि सचिव गुपचूप हितगुज करतात या सर्व प्रकारामुळे सामान्य नागरिकांना त्यांच्या कामकाजासाठी नाहकत्रास होत आहे या प्रकाराची सखोल चौकशी करून रिकव्हरी कडून फौजदारी कारवाई करावी अन्यथा पंचायत समिती कार्यालयापुढे आमरण उपोषणाचा इशारा कुणाल नाईक,गजानन प्रतापवार,अनिल राठोड, संदीप वायकुळे, सौ,रेखा गणेश भगत,सौ,सारजाबाई गणेश वाघमारे, सौ राजकुमारी भोयर, शाहीन इकबाल खान,मारुफजहाँ गुलशेर खान,या नऊ सदस्यांनी गटविकास अधिकारी महागाव यांना दिलेल्या तक्रारात उपोषणाचा इशारा दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad