Type Here to Get Search Results !

अत्यंत थाटात हुंडा पद्धतीला तिलांजली देत विवाह सोहळा संपन्न,गोल्ला यादव समाजासमोर नवीन आदर्श

अत्यंत थाटात हुंडा पद्धतीला तिलांजली देत  विवाह सोहळा संपन्न,गोल्ला यादव समाजासमोर नवीन आदर्श

लक्ष्मण भैरेवाड यांचा आदर्श शुभ विवाह सोहळा आठवणीत राहिल- संदेश कमटे मुंबई

भैरेवाड व नुकूलवाड परीवार चा आदर्श विवाह सोहळा
*हिमायतनगर प्रतिनिधी/जांबुवंत मिराशे*
हिमायतनगर; तालुक्यातील बोरगडी येथील बालाजी भैरेवाड यांचे द्वितीय चिरंजीव लक्ष्मण भैरेवाड, यांचा विवाह सोहळ्याने गोल्ला गोलेवार (यादव) समाजा समोर एक आदर्श निर्माण केले, लक्ष्मण यांनी सामाजिक बांधिलकी जपत दि.6/02/2022 रोजी काहळा येथील सर्वसामान्य कुटुंबातील राजाराम नुकूलवाड यांच्या मुलीशी लग्न केले सोहळा आनंदात पार पडला आहे. या सोहळ्याचे विशेष म्हणजे लक्ष्मण भैरेवाड यांनी स्वतःहून कोणत्याही प्रकारचा हुंडा न घेण्याचा केलेला संकल्प हुंडा या समाजविघातक प्रथेला दुर सारुन  हा विवाह सोहळा पार पडला. समाजातथ प्रचलित असलेल्या विघातक प्रथा बदलणे आजच्या सामाजिक पार्श्वभूमीवर समाजाला येणाऱ्या काळासाठी प्रगतीशील दिशा लक्ष्मण यांनी दाखवली आहे. नवरदेव लक्ष्मण ने हुंडा म्हणून एकही रुपया घेतला नाही यामुळे हा विवाह सोहळा समाजात व सगळीकडे चर्चेत आला आहे. येवढ्या मोठ्या प्रमाणात कोविड 19 चा प्रादुर्भाव असतांना सुध्दा महाराष्ट्रातील गोल्ला गोलेवार समाजात नव्हे तर ईतर समाजातही नवीन आदर्श निर्माण झाला आहे. विशेष विवाह सोहळा साठी संपुर्ण महाराष्ट्रातून समाज बांधवांनी हजेरी लावले आहेत. वधु वरांना भावी  सहजीवनासाठी शुभ आर्शिवाद देण्यासाठी समाजाचे प्रमुख नेते नांदेड जिल्हा अध्यक्ष संजय आऊलवार, मुंबई येथील कार्यकारी अभियंता संदेश कमटे साहेब, दै.विष्णुपूरी संपादक मारुती झेंपलवाड साहेब,जि.परिषद सदस्य कमठेवाड साहेब, हिमायतनगर ता.अध्यक्ष सुभाषराव शिल्लेवाड, मा.संरपच दिगांबर काईतवाड,पंचायत स.सदस्य बालाजी मदेवाड, निरंजन म्याकलवाड,धनाजी पाटील तलाठी सर, मुख्याध्यापक प्रभत गुरुजी काईतवाड, बाबु करेवाड, नागोराव काईतवाड, सरपंच सुधाकर काईतवाड,संजय मेडेवाड, गोल्ला यादव समाजक्रांती राज्य संपर्क प्रमुख महाराष्ट्र आभिषेक बकेवाड,विलास काईतवाड,प्रविण पाटील शिंदे,संरपच काहळा रामकिशन बहिरवाड, साईनाथ पाटील काहळ,उप सरपंच प्रकाश पाटील,मनोज पाटील मोरे,शुरेष आण्णा मलकजॉम,ज्ञानेश्वर मेडेवाड, बाबाराव भैरेवाड ,उपस्थित राहून वधु वरानां वैवाहिक जिवनासाठी आशीर्वाद दिले.
*" हुंडा या समाजविघातक प्रथेला समाजातून निर्मूलन करण्यासाठी तरुणांनी ठाम भूमिका घेणे गरजेचे आहे. लक्ष्मण भैरेवाड यांनी दाखवलेली सामाजिक संवेदनशीलता सर्व तरुणांत निर्माण होण्यासाठी गोल्ला यादव समाजसेवा संघ महाराष्ट्र या गोल्ला गोल्लेवार समाजाच्या संघटनेकडून तरुणांचे विवाहपूर्व प्रबोधन विविध कार्यक्रमात केले जाईल असे प्रतिपादन आनंद बालाजी आनेमवाड प्रदेश अध्यक्ष गोल्ला यादव समाजसेवा संघटना महाराष्ट्र यांनी केले.*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News