अंजनगाव खेलोबा येथे शिवजयंतीच्या निमित्ताने वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व विविध पदावर पदोन्नती मिळालेल्यांचा सत्कार
माढा प्रतिनिधी:
१९ फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती.अखंड हिंदुस्थानाचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची ३९२ वी जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली.
माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा येथे जिजाऊ बहुउद्देशीय संस्था व खेलोबा महाविद्यालय यांच्या वतीने शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व विविध पदावर पदोन्नती व निवड झालेल्यांचा सत्कार करण्यात आला.
त्याचबरोबर वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर च्या कोणकोणत्या संधी आहेत, याचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करण्यात आले.
गेल्या अनेक वर्षांपासून जिजाऊ बहुउद्देशीय संस्था ही तरुणांना नोकरीच्या संधी कशा उपलब्ध होतील त्याचे मार्गदर्शन करते.
यावेळी वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे
लटके प्रसाद (बी.डी.एस.)
आश्लेषा चौगुले (BAMS), निरंजन आलेकर ( BAMS,MS IN Obstetrics & Gynaecology ),तनुजा खडके (कोळी)( BAMS )
{जीवन क्षीरसागर, आलेकर नवनाथ, रामदास पाटेकर,शितल हरिदास पाटेकर, अक्षय मोहीते (Veterinary Doctor)}
पाटेकर स्मिता (M.Pharm) , वाघमोडे ऋतुजा (B.Pharm), पाटेकर दिपक (D. Pharm), वाघमोडे ऋतूराज ( D. Pharm )
अंजली धिमधिमे (GNM), काजल देवकुळे (GNM) यांचा सत्कार करण्यात आला.
त्याचबरोबर न्यायालयात वरिष्ठ लिपिक पदी पदोन्नती -चौगुले रवळनाथ
पंचायत समिती मध्ये लिपिक पदी निवड - नागेश माणिक इंगळे
महाराष्ट्र पोलीस, आर.पी.एफ़, एस. आर.पी मध्ये निवड- गडेकर प्रशांत राजेंद्र यांचाही सत्कार करण्यात आला.
उस्मानाबाद जिल्ह्याचे क्रीडा अधिकारी कैलास लटके यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
यावेळी श्री खेलोबा महाविद्यालयाचे
सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच जिजाऊ बहुउद्देशीय संस्थेचे पदाधिकारी व समस्त ग्रामस्थ
उपस्थित होते.