आदर्श प्रशालेत पाळणा व पोवाडा सादर करीत शिवजयंती साजरी
करकंब प्रतिनिधी
येथील छत्रपती शिवाजी महाराज शिक्षण प्रसारक व क्रीडा मंडळ संचलित आदर्श प्रशाला ज्युनियर कॉलेज मध्ये शिवजयंती निमित्ताने पाळणा, पोवाडा, लाटीकाटी प्रात्यक्षिक सह महापुरुषांवर भाषणे सादर करण्यात आली.
कोरोनामुळे दोन वर्षे सांस्कृतिक कार्यक्रमावर बंदी घालण्यात आली होती, सद्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शिवजयंती निमित्ताने सर्वत्र सांस्कृतिक कार्यक्रम होत आहेत. आदर्श प्रशालेत आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन माजी जि प सदस्य बाळासाहेब देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष रामदास शेटे, सचिव पांडुरंग व्यवहारे, मा सरपंच मारुती देशमुख, संतोष गुळमे, संजय रजपूत, नवनाथ खारे, सायली शेटे, धनश्री शेटे, देवळे, प्राचार्या विजया उंडे आदींसह शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राहुल हत्तरगे यांनी केले, बाळासाहेब देशमुख व पांडुरंग व्यवहारे यांनी शिवाजी महाराजांच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना भाषणातून दिली, सूत्रसंचालन भाग्यश्री स्वामी यांनी केले तर आभार भीमा व्यवहारे यांनी मानले.