Type Here to Get Search Results !

करकंब च्यारामभाऊ जोशी हायस्कूल चे राष्ट्रीय स्काऊट गाईड स्पर्धेत यश.

करकंब च्यारामभाऊ जोशी हायस्कूल चे राष्ट्रीय स्काऊट गाईड स्पर्धेत यश.




करकंब प्रतिनिधी :-लक्ष्मण शिंदे

भारत स्काऊट गाईड महाराष्ट्र राज्य नॅशनल लेव्हल इंटेग्रेशियन स्काऊट गाईड कॅम्प,इन वाय.सी.गडपुरी (हरियाणा)स्पॉन्सरड बाय नॅशनल हेड कॉर्टर न्यू. दिल्ली येथे१९ ते२३ फेब्रुवारी२०२२साठी महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व करण्याची संधी सोलापूर जिल्ह्यला मिळाली, रामभाऊ जोशी हायस्कूल, करकंब ता.पंढरपूर येथील ०८ स्काऊट विद्यार्थी व २ शिक्षक यांनी सहभाग घेऊन खालील राष्ट्रीय स्पर्धेमध्ये घवघवीत यश संपादन केले. 

सदर स्पर्धेत १६ राज्यांनी सहभाग घेतला होता.
चिफ कमिशनर भारत स्काऊट गाईड हेड आँफिस दिल्लीचे विश्वनाथ मिश्रा यांच्या हस्ते राज्याचे प्रदर्शन स्टेट एक्सीबीशियनऑफिशियल कॉम्पिटिशन सेकंड प्राईझ, राज्याचे स्पष्टीकरण(दर्शन) स्टेट एक्सपो सीशियन कॉम्पिटिशियन सेकंड प्राईझ,लोकनृत्य स्पर्धा फॉलक डान्स सेकंड प्राईझ, यामध्ये जोशी हायस्कूलमधील रोहन अशोक कुंभार,रोहन किरण ढोबळे,अथर्व विलास शिंदे,कुणाल सुनिल मोहिते,विवेकानंद दत्तात्रय लोकरे,विक्रम सुनिल जगताप शिवरत्न दत्तात्रय कुंभार,शंभुराजे दिलीप व्यवहारे, या ८ विद्यार्थ्यांना बक्षिसे व मानपत्र देण्यात आले.त्यांना स्काऊट युनिट लिडर एम. के. पुजारी सर सहा.लिडर हेमंत कदम यांचे मार्गदर्शन लाभले.

करकंबमधून महाराष्ट्र राज्यासाठी निवड,तेथून राष्ट्रीय स्पर्धेसाठी झालेली निवड व बक्षीसे मिळवल्यामुळे सदर विद्यार्थी व शिक्षकांचेअभिनंदन दयानंद शिक्षण संस्था नवी दिल्लीचे अध्यक्ष पद्मश्री पुनम सुरी ,स्थानिय सचिव महेशजी चौप्रा,महाराष्ट्र स्काऊट गाईडचे समन्वयक,राज्य ट्रेनर शंकर यादव सर व सोलापुर जिल्हा स्काऊट गाईड आँफिस यांनी अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad