Type Here to Get Search Results !

महाराष्ट्रातून हळद निर्यात वाढविण्यासाठी हिंगोली येथे "हळद प्रादेशिक परिसंवाद" संपन्न

महाराष्ट्रातून हळद निर्यात वाढविण्यासाठी हिंगोली येथे "हळद प्रादेशिक परिसंवाद" संपन्न




हिंगोली/नांदेड/यवतमाळ : हळद निर्यातीमध्ये महाराष्ट्राचा वाटा वाढविण्यासाठी हळद संशोधन व प्रक्रिया धोरण अभ्यास समितीच्या वतीने आयोजित केलेल्या आजच्या (दि.२४)परिसंवाद कार्यक्रमात मान्यवरांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले. यामाध्यमातून महत्वाची संधी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळणार आहे.नुकताच खासदार हेमंत पाटील यांनी कृषिमंत्री दादाजी भुसे यांना हळद धोरणाचा मसुदा सादर केला असून. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी,हिंगोली यांच्या अध्यक्षतेखाली एक दिवसीय परिसंवाद खासदार हेमंत पाटील यांच्या संकल्पनेतून आणि मसाले मंडळ इंडिया मुंबई व आत्मा हिंगोली विभाग यांच्या सहकार्याने हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडला. 
            
या प्रादेशिक परिसंवाद कार्यक्रमाला जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर,हिंगोली कृषी विभागाचे सहसंचालक शिवसांब लडके, मसाले मंडळाच्या मार्केटिंग सहसंचालक ममता रुपोलिया, स्पाईसेस बोर्डाच्या मार्केटिंग आणि निर्यात सल्लागार पी.पी.कनेल,तोंडापूर येथील कृषी विज्ञान केंद्र शास्त्रज्ञ पी.पी. शेळके,हिंगोली येथील आत्मा चे प्रकल्प संचालक युवराज शहारे,गंगाधर शृंगारे,पुणे येथील MIDH चे सल्लागार कृषिरत्न गोविंद हांडे,यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे अभ्यासू खासदार तथा हळद प्रक्रिया व अभ्यास धोरण समितीचे अध्यक्ष हेमंत पाटील यांचे अभ्यासपूर्ण विवेचनातून हळदीच्या क्लस्टरची संकल्पना समोर आली.परिसंवादात प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय बाजाराच्या गरजेनुसार मसाल्यांचा विकास आणि संवर्धन,गुणवत्ता मानके यासाठी मसाले मंडळाची भूमिका,हळदीचे विपणन आणि निर्यात,हळद काढणीनंतरच्या व्यवस्थापनाचे पॅकेज आणि फार्म गेटवर मूल्यवर्धन,उत्पादन तंत्रज्ञान आणि आत्मा ची भूमिका, हळदीमधील योग्यता,शेतकऱ्यांशी संवाद, हळद संशोधन आणि विकास, हळद बेणे, हळद उत्पादन तंत्रज्ञान, सेंद्रिय हळद आणि लागवड तंत्रज्ञान, हळद काढणी, हळद काढणी पश्चात प्रक्रिया, हळद विपणन, हळद ट्रेसेबिलीटी आणि निर्यात, ऑनलाइन कमोडीटी एक्स्चेंज ट्रेडिंग प्लॅटफॉर्म - बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, अशा विविध विषयांवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.तसेच यावेळी,अनुभवी शेतकऱ्यांची यशोगाथा घेण्यात आल्या.
           
आजच्या काळात हळद पिकाला मसाले , सौंदर्य प्रसाधने, औषधी उत्पादनात मागणी वाढत आहे.अत्यंत कमी कालावधित कमी खर्चात हे पीक शेतकऱ्यांना मोठा फायदा देऊन जाणारे आहे त्यामुळे यावर होणारा खर्च आणखी कमी कसा करता येईल आणि शेतकऱ्यांना हळद काढणीच्या वेळी होणाऱ्या अडचणी कश्या सोडवता येतील हा या परिसंवादा मागचा उद्देश होता.डॉ.श्रीमती ममता रुपोलिया,यांनी ‘आंतरराष्ट्रीय बाजाराच्या गरजेनूसार मसाले आणि गुणवत्ता मानकांच्या विकासासाठी आणि प्रोत्साहनासाठी मसाले मंडळाची भुमिका मांडली. पी.पी.कनेल यांनी हळदीचे विपणन आणि निर्यात बाजार विपणन आणि निर्यात प्रोत्साहन याबाबत मार्गदर्शन केले.जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शिवराज घोरपडे यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग (PM - FME) योजनेची माहिती देवून शेतकरी तसेच तरुण उदयोजक यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. एस.व्ही.लाडके यांनी अपेक्षा मार्फत निर्यात करण्याच्या अनुषंगाने हळद पिकाच्या शेतकरी यांना नोंदणी करण्याचे आवाहन केले.तत्पूर्वी हळद या मसाले पिकाची ‘एक जिल्हा एक उत्पादन’ याअंतर्गत हिंगोली जिल्हयासाठी निवड करण्यात आली आहे. सदर परिसंवादासाठी जिल्हयातील प्रगतशील शेतकरी उत्पादक कंपनी प्रतिनिधी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News

Hollywood Movies