Type Here to Get Search Results !

▪️वाघाच्या हल्यात शेतकरी जखमी... ▪️शेतकऱ्याच्या जिद्दी पुढे वाघाने घेतला काढता पाय

▪️वाघाच्या हल्यात शेतकरी जखमी...  ▪️शेतकऱ्याच्या जिद्दी पुढे वाघाने घेतला काढता पाय


फुलसावंगी प्रतिनिधी /
      येथुन जवळच असलेल्या चिल्ली येथे वाघाने शेतात दैनंदिन काम करत असलेल्या शेतकऱ्यांवर हल्ला करून जखमी केले.



       चिल्ली (ई) येथील शेतकरी सुखदेव दगडुजी मुरमुरे (वय ४४) हे वाघाने केलेल्या हल्यात गंभीर जखमी झाले.ते नेहमी प्रमाणे आपल्या शेतातील सकाळी १२ वाजता दैनंदिन कामे करत होते. तेव्हा अचानक वाघाने केलेल्या हल्यात शेतकरी गंभीर जख्मी झाले.तेव्हा त्यांनी त्यांच्या हातात असलेल्या हंड्याने वाघावर स्वतःच्या बचावासाठी प्रती हल्ला करून वाघाच्या हल्यातून स्वत:चा बचाव केला.शेकऱ्याने जिवाच्या आकांताने वाघावर हंड्याने केलेल्या प्रतिहल्ल्यात वाघाला शेतकऱ्याच्या जिद्दी पुढे हार मानुन काढता पाय घेऊन पळावे लागले,



     चिल्ली (ई) येथील शेजारी शेतकऱ्यांनी सुखदेव मुरमुरे त्यांना फुलसावंगी येथील प्राथमिक अरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले त्यावेळी येथील डॉ. सदफ राणा यांनी हाताला तिन ठिकाणी व पायाला तिन ठिकाणी चावा घेतल्याची माहिती दिली तसेच त्यांच्यावर प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारास सवना येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवीण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad