Type Here to Get Search Results !

सनी अहिवळे यांनी 1000 झाडे लावण्याचा केलेला संकल्प खूप कौतुकास्पद - श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर ( महाराजसाहेब )

सनी अहिवळे यांनी 1000 झाडे लावण्याचा केलेला संकल्प खूप कौतुकास्पद - श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर ( महाराजसाहेब ) 




फलटण प्रतिनिधी, विकास बेलदार

फलटण - कोरोना महामारीच्या काळात ऑक्सिजनची कमतरता भासत असल्यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. त्यामुळे झाडांचे महत्व सगळ्यांच्या लक्षात आले आहे. वृक्ष तोडीमुळे दिवसेंदिवस ऑक्सिजनची कमतरता जाणवणार असून सनी अहिवळे यांनी 1000 झाडे लावण्याचा केलेला संकल्प खूप कौतुकास्पद असल्याचे असे प्रतिपादन विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले. मंगळवार पेठ फलटण वृक्षारोपणाचा उद्घाटन सोहळा प्रसंगी ते बोलत होते. यावेळी फलटण नगर परिषदेचे माजी सभापती सनी दादा अहिवळे, सुधीर अहिवळे, प्रशांत अहिवळे, बाळासाहेब काकडे आदी मान्यवर उपस्थित होते. फलटण शहरांमध्ये एक हजार झाडे लावण्याचा संकल्प सनी दादा अहिवळे यांच्या कडून करण्यात आला होता. याची सुरुवात आज मंगळवार पेठ येथून झाली. यावेळी बोलताना ना. श्रीमंत रामराजे म्हणाले की, या वृक्षरोपण संकल्पामध्ये फलटण शहरवासीय मोठ्या संख्येने सहभागी होऊन जास्तीत जास्त झाडे लावून फलटण शहराला हरित करावे व भविष्यात आपल्याला ऑक्सिजनची कमतरता जाणवू नये म्हणून प्रयत्न करावा असे आवाहन विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले.


यावेळी सनी दादा अहिवळे म्हणाले कि, भविष्यात कोरोना किंवा अन्य एखादे संकट येउ नये म्हणून त्यावर उपाययोजना करण्यासाठी महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या आदेशानुसार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण शहरांमध्ये एक हजार झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आलेला आहे. यापुढे नगरपालिका हद्दीतील कोणतीही परवानगी अथवा शासकीय कागदपत्रे देताना एक झाड लावण्याची विनंती करावी असे मत अहिवळे यांनी व्यक्त केले. यावेळी सनी काकडे, संग्राम अहिवळे, अप्पा काकडे, शिवा अहिवळे, सुधीर अहिवळे सर, सिद्धार्थ अहिवळे, अविनाश सरतापे, सनी मोरे, मंगेश जगताप, सागर अहिवळे, राकेश माने, रवि गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad