Type Here to Get Search Results !

भिवंडी येथे बृहन्मुंबई महानगरपालिका प्राथमिक शाळा भरते झाडा खाली

भिवंडी येथे बृहन्मुंबई महानगरपालिका प्राथमिक शाळा भरते झाडा खाली

 

 उन्हात शिक्षण घेतात विध्यार्थी 

पर्यायी धोकादायक ठिकाणी शाळेत विद्यार्थ्यांना पाठविण्यास पालकांचा नकार 


सध्या राज्यात शिक्षण विभागाचे दिवस वाईटच सुरू आहे असेच काही दिसत आहे.या आठवड्या म्हणजे च 27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिन साजरा होत असून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून सर्वां कडून प्रयत्न होत असताना मुंबई महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागा कडून भिवंडी तालुक्यातील धामणगाव येथील मराठी प्राथमिक शाळा धोकादायक झाल्याने जमीनदोस्त केल्या नंतर तेथील विद्यार्थ्यांची पर्यायी व्यवस्था तब्बल सहा किलोमीटर अंतरावरील पिसे पांजरापोळ येथे डिझेल व ऑइल पंप असलेल्या परिसरातील एका गोदामात  केल्याने पालकांनी आपल्या मुलांना त्याठिकाणी पाठविण्यास नकार दिल्याने धामणगाव येथील पडीक धोकादायक इमारतींसह उघड्यावर झाडा खाली शाळेचे वर्ग भरविण्याची वेळ येत आहे. मुंबई च्या महापौर किशोरी पेडणेकर आपण लक्ष देण्याची गरज आहे. 



  तर सविस्तर माहिती अशी की मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारी तानसा येथील पाईपलाईन भिवंडी तालुक्यातील अनेक गावातून गेली आहे. 

शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित केल्यानंतर येथील शेकडो भूमीपूत्र मुंबई महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागात नोकरीस लागल्याने या कर्मचाऱ्यांच्या मुलांना पालिकेच्या प्राथमिक शिक्षण मिळावे यासाठी धामणगाव येथे प्राथमिक शाळा सुरू करण्यात आली. 

धामणगाव, खांडपे या ग्रामीण भागातून जात असताना त्यासाठी 1963 मध्ये दोन मजली इमारत बांधण्यात आली होती . 

आता इमारत नादुरुस्त धोकादायक ठरल्याने पालिकेने ही इमारत जमीनदोस्त करण्यात आली 

शाळा भरविण्यासाठी पाणीपुरवठा विभागाने या शाळे पासून तब्बल सहा किमी अंतरा वरील पिसे पांजारपोळ येथील एका गोदामात करण्यात आली . 

या उघड्यावर भरणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांना ना पाण्याची सोय ना शौचालय ची सोय या विद्यार्थी विद्यार्थीनी ना रोजच सामना करावा लागत आहे 

या ठिकाणचे दुर्दैव म्हणजे पालिकेच्या वाहनांसाठी डिझेल व ऑइल वितरण करणारे डिझेल पंप या गोदाम इमारती पासून अवघ्या काही अंतरावर असल्याने कधी ही दुर्घटनेची भीती मनात बाळगून पालकांनी या ठिकाणी शाळा भरविण्यास विरोध केल्याने सध्या धामणगाव येथील पाणीपुरवठा विभागाच्या नादुरुस्त इमारतींसह  झाडाखाली उघड्यावर शाळा भरविली जाते .येथील धामणगाव,कशिवली,खांडपे, चिंचवली,गोरसाई,भिनार,
निंबवली,वडपे यांसह गंगारामपाडा,धापशी पाडा यांसह किमान 15 आदिवासी पाडे येथील सुमारे 300 विद्यार्थी येथील प्राथमिक शाळेत शिक्षण घेत असून त्यामध्ये अंगणवाडी मधील 20 बालकांचा समावेश आहे .या शाळेतील सुमारे 80 टक्के विद्यार्थी आदिवासी समाजातील  आहेत हे विशेष परंतु येथील शाळा इमारत पुन्हा बनविण्या बाबत कोणतीही कल्पना पालिका प्रशासन देत नसल्याने विद्यार्थ्यांसह पालक हवालदिल झाले आहेत. 


 या शाळेत पंचक्रोशीतील गाव पाड्यातील दोन पिढ्या शिक्षण घेऊन गेल्या आज तिसरी पिढी या ठिकाणी शिक्षण घेत असताना मुंबई महानगरपालिका येथील गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणा पासून वंचित ठेवत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष परेश चौधरी यांनी केला असून पालिकेने पर्यायी व्यवस्था म्हणून पिसे पांजरापोळ येथे गोदामात करणे हे विद्यार्थ्यांना धोक्यात टाकण्या सारखे असल्याची प्रतिक्रिया देत या बाबत पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांना निवेदन देऊन येथील विद्यार्थ्यांची याच परिसरात शाळा उभारून व्यवस्था न केल्यास पाणी पुरवठा अभियंता यांच्या कार्यालयात घुसून शाळा भरविणार असल्याचा इशारा परेश चौधरी यांनी दिला आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad