Type Here to Get Search Results !

गोदावरी अर्बनने घेतली १५०० कोटीच्या ठेवींची भरारी

गोदावरी अर्बनने घेतली १५०० कोटीच्या ठेवींची भरारी



यवतमाळ प्रतिनिधी:- संजय जाधव
नांदेड/ हिंगोली /यवतमाळ : राज्यातील सहकार क्षेत्रात कायम नाविन्यपूर्ण कामगिरीमुळे छाप असणाऱ्या गोदावरी अर्बन अजून एक विक्रम प्रस्थापित केला आहे.नुकताच १५०० कोटींच्या ठेवींचा पल्ला अल्पावधीत गाठणारी गोदावरी अर्बन ही सहकार क्षेत्रात एकमेव संस्था ठरली आहे.गोदावरी अर्बनचे संस्थापक खासदार हेमंत पाटील यांची व्यापक दूरदृष्टी,अध्यक्ष राजश्री पाटील यांचे वेळोवेळी लाभले मार्गदर्शन व व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर यांचे सूक्ष्म नियोजन आणि कर्मचाऱ्यांची अथक परिश्रम या यशस्वी गुरुकिल्लीच्या बळावर गोदावरी अर्बन दिवसागणिक आपल्या यशाचे टप्पे गाठत आहे.




            मागील दोन वर्षांपासून अधिक काळ कोव्हिडं महामारीच्या संकटाने जगाभरात हाहाकार माजला असतांना.देशभरातील अनेक नामवंत संस्थांनी आपले कामकाज थांबवले. त्यासोबतच कर्मचाऱ्यांना कामा वरून कमी देखिल केले होते.अशा जागतिक संकटाच्या काळात गोदावरी अर्बन आपल्या कार्यक्षेत्रातील पाचही राज्यातील सर्व शाखा एकही दिवस बंद न ठेवता ग्राहकांना अविरत सेवा देत होती.जेष्ठ नागरिकांना सामजिक जाणिवेतून तर घरपोच सेवा दिली.या संकट काळात अनेक संस्थाचे सर्वच व्यवहार ठप्प पडलेले असतांना देखिल गोदावरी अर्बनने आपल्या सूक्ष्म नियोजनाच्या माध्यमातून व्यवसायात वृध्दी करीत १५०० कोटींच्या ठेवींचा पल्ला गाठला व आपला व्यवसाय २७०० कोटीवर नेला आहे. इतकेच नव्हे तर जगभरातील अनेक नामवंत संस्थानी आपल्या कर्मचाऱ्यांना कामा वरून कमी केले असतांना देखिल गोदावरी अर्बनने आपल्या एकही कर्मचाऱ्याला कमी न करता उलट त्यांच्या कामगिरी नुसार बढती दिली.


त्यासोबत वेतनवृध्दी , दिवाळीमध्ये बोनस देखिल दिले.या संकट काळात संपूर्ण लॉक डाऊन काळात संस्थेने आपले बँकमित्रा जे दैनंदिन बाजारातून व्यवसायिकांच्या ठेवी जमा करतात त्यावर त्यांचे कमिशन असते त्यातून त्यांचा उदरनिर्वाह चालत असतो. पण लॉक डाऊन काळात सर्वच बाजारपेठा बंद असल्यामुळे या बँकमित्रांना गोदावरी अर्बनने अग्रीम आर्थिक मदत देत कौटुंबिक सदस्य म्हणून काळजी घेतली.नुकतेच संस्थेने नरिमन पॉईंट,मुबंई येथे सेन्ट्रल ऑपरेशनचे हब निर्माण केले. जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानाचा स्विकार करून कर्ज वितरणातील सुरक्षितता व वसुली व्यवस्थापनाचे केंद्रीकरण या कार्यालयाच्या माध्यमातून सुरू आहे.


         या विक्रमी यशाबद्दल संस्थापक अध्यक्ष खासदार हेमंत पाटील,अध्यक्ष राजश्री पाटील व समस्त संचालक मंडळांने सर्व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले तर सभासद, ठेवीदार ग्राहकांचे त्यांनी दाखविलेल्या विश्वासा बद्दल आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad