Type Here to Get Search Results !

राष्ट्रवादीच्या 'काकां'ची 80 व्या वयात एकाकी झुंज अपयशी ; सुनेचा पराभव जिव्हारी लागणार...

राष्ट्रवादीच्या 'काकां'ची 80 व्या वयात एकाकी झुंज अपयशी ; सुनेचा पराभव जिव्हारी लागणार...

             राजकीय गेम की गोम. 



सोलापूर - करकंब : जिल्हा दूध संघाची निवडणूक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे यांच्या सून वैशाली जितेंद्र साठे यांच्या उमेदवारीने रंगतदार झाली. मुळात काका साठे यांना सत्ताधारी पॅनल मधून उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी वाट पाहिली कुणीही विचारले नाही म्हणून त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी माणूस पाठवला. वेळ निघून गेली होती, शेवटी त्यांनी काही झाले तरी लढायचे असा निर्णय घेत दूध संघ बचाव कृती समितीच्या पॅनलमध्ये एन्ट्री केली.
 
काका साठे यांच्या सून आपल्या पॅनेलमध्ये आल्याने दूध संघ बचाव कृती समितीला एक प्रकारे ताकद मिळाली. 80 वर्षाच्या काका साठे यांनी या निवडणुकीसाठी आपला संपूर्ण जोर लावला. सर्व तालुके फिरून मतदारांशी गाठीभेटी घेतल्या. काका साठे यांचे मोहोळच्या माजी आमदार राजन पाटील यांच्याशी चांगले जुळते. स्वतः राजन पाटील यांची 60 च्या वर मते असल्याने त्यांच्या मदतीची अपेक्षा काका यांना होती. उमेश पाटील यांनी सुद्धा आता राजन पाटील किती मदत करतात बघतो असे थेट काका साठे यांना बोलून गेले होते. शेवटच्या क्षणी उमेश पाटलांनी दूध संघ बचाव कृती समितीला मतदान करण्याचे आवाहन आपल्या फेसबुकच्या माध्यमातून केले. त्यातच 
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे तब्बल तीन दिवस सोलापूर शहर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते या दौऱ्यात त्यांनी काका साठे यांच्या कामाचे तोंडभरून कौतुक केले. यावरूनही काही मतं निश्चित मॅनेज झाली असतील अशी चर्चा झाली. निवडणुकीसाठी चुरशीने मतदान झाले. केवळ सोळा मतांनी वैशाली साठे यांचा पराभव झाला. यापूर्वी बीबीदारफळ जिल्हा परिषद मतदारसंघातून वैशाली साठे या पराभूत झाल्या होत्या. त्यानंतर जिल्हा दूध संघात त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. 
काका साठे यांच्या सून या निवडणुकीत उमेदवार असल्याने दिलीप माने यांची ही प्रतिष्ठा पणाला लागली होती परंतु वैशाली साठे यांचा पराभव झाल्यानंतर सर्वात प्रथम जल्लोष झाला तो उत्तर तालुक्यातील नेत्यांचा कार्यकर्त्यांचा. गुलालाची मुक्त उधळण करत एकच झलक, दिलीप मालक..., अशी जोरदार घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. 
 वय 80 असतानाही काका साठे आपल्या सुनेसाठी जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांसमोर एकाकी लढण्याचं पाहायला मिळालं मात्र त्यांच्या पदरी निराशा आणि पराभव आला. दूध संघ बचाव कृती समितीतील सर्व उमेदवारांना 80-90 च्या दरम्यान मध्ये मिळाली. परंतु वैशाली साठे यांना 144 मते मिळाली त्यामुळे सुमारे 50 ते 55 मध्ये कुठून वाढली असाही प्रश्न आता उपस्थित केला जाणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad