जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी स्वतः गाडीतून उतरून करकंब येथील शिवकालीन तलावाची व पूर्व भागाची जाणून घेतली माहिती
अजित सिंह देशमुख मित्रपरिवार व त्यांच्या टीमकडून केलेल्या कामाचा नामदार जयंत पाटील यांनी घेतला आढावा
करकंब मध्ये जयंत पाटील यांचे जंगी स्वागत अजितसिंह देशमुख मित्र परिवाराकडून स्वागत व सत्कार
करकंब प्रतिनिधी: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील साहेब सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी करकंब येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्त्यांची भेट घेतली व त्यांच्या कडून सत्कार स्वीकारला यावेळी करकंब येथील सर्वात महत्त्वाचा असलेला शिवकालीन तलाव पाणी सोडण्याबाबत व पूर्व भागातील पाणी प्रश्नाच्या बाबतसविस्तर चर्चा केली . करकंब येथील शिवकालीन तलावाचा प्रश्न गेले दहा ते बारा वर्षापासून सर्व निवडणुकांमध्ये कळीचा मुद्दा बनलेला आहे पण करकंब येथील अजित देशमुख मित्र मंडळाने हा विषय उचलून धरल्याने व त्याचा सतत पाठपुरावा गेली दीड ते दोन वर्ष झाले चालू केल्यामुळे त्याच्यामध्ये त्यांनी श्री देशाचे माजी कृषिमंत्री शरद चंद्र पवार साहेब यांची भेट घेतली त्याच्या नंतर पवार साहेबांनी त्यांना तलावात पाणी आणण्यासंदर्भात सर्वे करण्यासाठी सांगितले त्यानंतर अजित देशमुख मित्र मंडळाने लोकवर्गणी करून खाजगी सर्वेक्षण करून घेतले. व त्यानंतर नोव्हेंबर 2019 रोजी त्यांनी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदामंत्री नामदार जयंत पाटील , लोकप्रिय आमदार बबनदादा शिंदे यांची मुंबई येथे मंत्रालयात भेट घेतली . त्यानंतर पुणे येथे विभागीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत क्रांतिकारक अडचणी दूर करून याबाबतचा अहवाल शासनाकडे सादर केला.व त्यांना करकंब येथील शिवकालीन तलावाचा केलेला पहिला नकाशात दाखवला पाणी कशा पद्धतीने आणता येते .हे समजावून मंत्रिमहोद यांना सांगितले .त्यानंतर जलसंपदामंत्री महाराष्ट्र राज्य आणि शासन स्तरावरून करकंब गावच्या शिवकालीन तलावाचा सर्वे करण्याचे आदेश देण्यात आले होते त्यानंतर दिनांक 7 जानेवारी 2022 रोजी उजनी कार्यकारी अधिकारी आर पी मोरे सीना माढा उपसा जलसिंचन योजनेचे सि टी राठोड ,कारंडे साहेब त्यांनी येथील शिवकालीन तलावासाठी याठिकाणी प्रत्यक्ष येऊन भेट देऊन पूर्ण तलावाची पाहणी सर्व टीम बरोबर केली होती. त्यानंतर करकंब येथील शिवकालीन तलावात पाणी येईल अशी आशा सर्व गावकऱ्यांना लागली होती. पण शासकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं की एवढ्या नकाशावर ती पाण्याचा अंदाज लावता येणार नाही की तलावामध्ये पाणी येते का नाही ते तंतोतंत करावे लागेल तरच त्याच्यावरती आपल्याला पुढे शिवकालीन तलावाचा L सर्वेक्षण करून घ्यावा लागेल त्याच्यानंतर आपल्याला पुढील दिशा ठरवता येईल त्यानंतर लागलीच दोनच दिवसानंतर अजितसिंह देशमुख मित्र मंडळ करकम त्यांनी कोणाचीही मदत न घेता L सर्वे करून घेतला व त्यानंतर तो लागलीच सर्वे शासनदरबारी सर्व ठिकाणी त्याचे अहवाल शासनाला सादर केले तलावांमध्ये पाणी येण्यासाठी ज्या गोष्टी पाहिजे होते त्या पूर्ण करण्याचा अजिबात विलंब केला नाही सर्व करकंब येथील पूर्व भागातील शेतकऱ्यांना एक आशा निर्माण झाली ती शिवकालीन तलावात पाणी येईल . केलेले सर्व मंत्रीमहोदयांच्या समोर
करकंब येथे जो दौरा झाला त्याच्यामध्ये सर्व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना या एल सर्वेक्षण व केलेल्या कामाचे अहवाल सादर केला.
यावेळी विशेष करूनजलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी स्वतः गाडीतून उतरून अजित्सिंह देशमुख मित्र मंडळ व त्यांच्या टीमने केलेल्या कार्याचे स्वतः बारकाईने लक्ष देऊन सर्व माहिती जाणून घेतली. त्यानंतर जलसंपदा मंत्री यांचा सत्कार अजित देशमुख मित्र मंडळातर्फे करण्यात आला .यावेळी प्रमुख उपस्थिती युवक नेते मा. कार्याध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस अजितसिंह देशमुख , माढा मतदार संघाचे पदवीधर राष्ट्रवादी अध्यक्ष मिथुन चंदनशिवे ,संतोष शिंदे, अशोक देशमुख ,विजयसिंह निकम ,नितीन दुधाळ, रामचंद्र सलगर ,प्रकाश नागरस, महेश गुजरे शैलेश जवारे राजेंद्र खारे माधव व्यवहारे धनाजी लोकरे हनुमंत भंडारे विष्णू केले दिलीप भंडारे अमोल माळी रमेश खारे श्रेनिक शहा बंडू चंदनशिवे नागेश शेटे संतोष शेटे राजेश गुळमे यादव देशमुख सुनील देशमुख हनुमंत खारे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.