युवा नेते व भावी जिल्हा परिषद सदस्य प्रणव परिचारक यांचा करकंब येथे विशेष सन्मान व सत्कार
आरपीआय नेते प्रदीप भाऊ खंकाळ यांनी केला विशेष सत्कार.... युवा नेते प्रणव परिचारक यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची साधला संवाद.
करकंब प्रतिनिधी :- लक्ष्मण शिंदे
सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहे. त्यातच पंढरपूर तालुक्याचे आणि विशेषता करकंब जिल्हा परिषद गटातून उमेदवारी मिळेल या अपेक्षेने झंझावाती दौरा करत असलेले युवा नेते प्रणव परिचारक हे करकंब येथे आले असता ,करकंब येथील आरपीआयचे नेते प्रदीप भाऊ खंकाळ यांनी युवा नेते प्रणव परिचारक यांचा विशेष सन्मान व सत्कार करून एसटी स्टँड ते गावातून संवाद दौरा केला.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे लक्ष्मण वंजारी, माजी ग्रामपंचायत सदस्य सुनील मोहिते, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र पवार, आरपीआयचे शहराध्यक्ष राजाभाऊ शिंदे, मनोज शिंदे औदुंबर कुंभार संदीप शिंगटे अनिल शिंदे आदीसह बहुसंख्य पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.