राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुरूगौरव शिक्षकरत्न पुरस्कार 2022 ने शिक्षक अशोक गायकवाड सन्मानित.
मुरबाड प्रतिनिधी लक्ष्मण पवार
मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी (रजि.ट्रस्ट) च्या वतीने गुणिजन गौरव पुरस्कार प्रदान समारंभ राज्यस्तरीय व राष्ट्रीयस्तर पुरस्कार वितरण सोहळा दि.22-02- 2022 रोजी दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र मुंबई येथे संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरूवात जय जय महाराष्ट्र माझा या समुहगीताने व छत्रपती शिवाजीमहाराज व विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जयघोष करून करण्यात आली.
या वेळी शिक्षक अशोक गायकवाड यांना उत्कृष्ट शैक्षणिक कार्याबद्दल राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुरूगौरव शिक्षकरत्न पुरस्कार 2022 प्रमुख मान्यवर ह.भ.प.मा.श्यामसुंदर महाराज सोन्नर आळंदीकर, सुप्रसिद्ध साहित्यिक मा.रमेश आव्हाड, इंटरनॅशनल टॅलेंट आयकॉन मा.डाॅ.महालक्ष्मी वानखेडकर यांचे हस्ते मानाचा फेटा,महावस्त्र,आकर्षक सन्मान चिन्ह, सन्मानपत्र देऊन सन्मानपूर्वक देण्यात आला.
शिक्षक अशोक गायकवाड जिल्हापरिषद शाळा डोहोळेपाडा,केंद्र कोशिंबी,ता. भिवंडी येथे कार्यरत असून त्यांची एकूण सेवा 24 वर्ष 10 महिने पूर्ण झाली आहे.तसेच ते कोकण विभागीय उपाध्यक्ष कास्ट्राईब संघटना,अध्यक्ष सिद्धार्थ फाऊंडेशन वासिंद, ठाणे जिल्हा संघटक प्रमुख समतासैनिक दल अशा विविध सामाजिक पदावर कार्यरत आहेत. त्याना अनेक सुप्रसिद्ध सामाजिक संस्थांच्या वतीने विविध जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय पुरस्कारांने सन्मानित करण्यात आले आहे.
यावेळी शिक्षक अशोक गायकवाड यांनी सांगितले आजचा हा पुरस्कार मला एक दुर्मिळ वैशिष्टय़पूर्ण 22- 2-2022 ह्या तारखेला प्राप्त होत आहे हा माझ्यासाठी सोनेरी क्षण आहे.माझे आपले सर्वांचे प्रेरणास्थान, आदर्श, भारत देशाचे उद्धारक विश्वरत्न, भारतीय संविधान निर्माते ,महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याच मुळे हे शक्य झाले आहे म्हणून पुरस्कार स्वीकारल्यानंतर मी चैत्यभूमी दादर येथे जाऊन डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले व बुद्धवंदना ग्रहण केली.सोबत माझे मित्र कास्ट्राईब कोकण विभागीय अध्यक्ष संतोष गाढे होते.
सदर पुरस्कार समारंभाला अनेक मान्यवर व संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून आलेले गुणवंत,यशवंत पुरस्कार्थी उपस्थित होते.