Type Here to Get Search Results !

करकंब येथील अमोल माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयाचा बारामती कृषिक-2022 अभ्यास दौरा

करकंब येथील अमोल माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयाचा बारामती कृषिक-2022 अभ्यास दौरा


खासदार सुप्रियाताई सुळे यांनी आपुलकीने विद्यार्थी व शेतकऱ्यांची केली विचारपूस.

करकंब प्रतिनिधी: लक्ष्मण शिंदे 

     अमोल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय करकंब चे संस्थापक अध्यक्ष अमोल दादा शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विज्ञान व तंत्रज्ञान विषयांतर्गत कृषी विज्ञान केंद्र बारामती आयोजित "कृषिक-2022" कृषी प्रदर्शन अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपस्थित खासदार सुप्रियाताई सुळे यांनी विद्यार्थी व शेतकऱ्यांची आपुलकीने विचारपूस केली.

        शेती विषयक अनेक समस्या वर शेतकऱ्यांना पर्याय देण्याचा प्रयत्न या प्रदर्शनामध्ये केला आहे. प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांना होमिओपॅथी व आर्टिफिशिअल इंटेलिजन्स चा कृषी क्षेत्रामध्ये प्रभावी वापर करून विषमुक्त उत्तम प्रकारची शेती करता येते याचे जिवंत प्रात्यक्षिक, एम्ब्र्यो ट्रान्सप्लांट पद्धत वापरून वासरांची निर्मिती व पशुरोग निदान सुविधा तसेच भाजीपाला गुणवत्ता केंद्रात भाजीपाला लागवडीचे प्रगत तंत्रज्ञान व एक्सपोर्ट चे सर्व मार्गदर्शन विद्यार्थ्यांना व शेतकऱ्यांना संबंधित अधिकाऱ्यांनी केले. सूक्ष्म अन्न प्रक्रिया, लघुउद्योग,अन्न व फळ प्रक्रिया संदर्भात माहिती विद्यार्थ्यांनी जाणून घेतली. फुलांच्या विविध जाती व लागवड तंत्रज्ञान मधुमक्षिका पालन , रेशीम उद्योग, जैविक खते यासंदर्भात सर्व माहिती विद्यार्थ्यांनी कुतूहलाने जाणून घेतली.

         यावेळी उपस्थित कॉलेजचे प्राचार्य मा. विकास शेळके सर, प्राचार्य किसन सलगर सर ( सह्याद्री ITI ) , कृषी कृषी विज्ञान आणि तंत्रज्ञान ( Crop production) विषय शिक्षक प्रा. प्रमोद रेडे पाटील , प्रा. सुरज कवडे ,प्रा.तुषार शिंदे, प्रा. दस्तगीर शेख ,प्रा. सागर गायकवाड, प्रा. लक्ष्मी माने मॅडम, प्रा. प्रतिक्षा शिंदे, प्रा.अनिता मोरे व प्रा. यादव मॅडम आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News