सोशल मीडिया च्या या चर्चेमुळे करकंब जिल्हा परिषद गटात उडाली एकच खळबळ
मिनी मंत्रालय अर्थात करकंब जिल्हा परिषद गटातून जाण्याचा मार्ग मोकळा....?
करकंब प्रतिनिधी :- लक्ष्मण शिंदे
मिनी मंत्रालय अर्थात सोलापूर जिल्हा परिषद हे अगदी अत्यंत महत्वपूर्ण आणि आर्थिक दृष्ट्या, विकासात्मक विविध योजनांची लोकहिताची कामे करून सामाजिक हित जोपासून खऱ्या अर्थाने लोकशाही जिवंत ठेवून जाण्याचा एकमेव जिल्हा परिषद अर्थात मिनी मंत्रालय म्हणून हाच एक राजमार्ग असल्यामुळे या मिनी मंत्रालयामध्ये अनेक जण संधी मिळावी म्हणून इच्छुक असतात, काहीजण प्रामाणिकपणे त्यात प्रयत्न करतात, आणि यशस्वीपणे यामध्ये लोकशाही जिवंत ठेवून सामाजिक हित जोपासण्याचे काम करीत असल्याचे या जिल्हा परिषद च्या माध्यमातून होत असते. सध्या जिल्हा परिषद अर्थात मिनी मंत्रालय व पंचायत समिती या निवडणुकीची जोरात रणधुमाळी सुरू आहे. सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात असलेल्या मुख्य गावागावातील प्रत्येक जिल्हा परिषद गटांमध्ये ज्या त्या पद्धतीने यामिनी मंत्रालयात संधी कशी प्राप्त होईल यादृष्टीने सध्या सावध पाऊल उचलीत आहेत. असे असले तरी सोलापूर जिल्हा परिषद मध्ये नेहमीच करकंब जिल्हा परिषद गट हा अत्यंत महत्त्वाचा आणि चर्चेचा जिल्हा परिषद गट म्हणून ओळखला जातो. या करकंब जिल्हा परिषद गटातून सोशल मीडिया, फेसबूक, व्हाट्सअप आणि विविध माध्यमाद्वारे व करकंब जिल्हा परिषद गटातून करकंब येथील सोलापूर सरपंच परिषद संघटनेचे जिल्हाध्यक्ष व करकंब चे माजी सरपंच आणि विद्यमान उपसरपंच युवा नेते आदिनाथ देशमुख यांची भावी जिल्हा परिषद सदस्य म्हणून प्रचंड प्रमाणात व्हायरल चर्चा होत असल्यामुळे या करकंब जिल्हा परिषद गटातून जिल्हा परिषद अर्थात मिनी मंत्रालयामध्ये प्रवेश करण्याची संधी या सोशल मीडियाच्या चर्चेद्वारे होत असल्याने करकंब जिल्हापरिषद गटामध्ये परत एकदा राजकीय गोटात एकच खळबळ उडाली आहे.
सरपंच परिषदेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष व विद्यमान उपसरपंच आदिनाथ देशमुख यांनी यापूर्वी ग्रामपंचायत सदस्य ,उपसरपंच ,सरपंच ,या माध्यमातून आपल्या संघटन कौशल्य आणि समाजातील अठरापगड जातीतील सर्व लोकांना बरोबर घेऊन त्यातच करकंब जिल्हा परिषद गटातील असलेल्या अनेक लोकांशी पदाधिकाऱ्यांसी गेल्या अनेक वर्षापासून स्नेहसंबंध निर्माण केल्यामुळे त्यातच विशेषता पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या माध्यमातून विविध पदाधिकारी तसेच अधिकारी यांच्या मधील असलेला सुसंवाद आणि त्यातून करत असलेली विकास कामाच्या माध्यमातून याबाबत सोशल मीडियावर होत असलेली चर्चा यामुळे याचा करकंब जिल्हा परिषद गटातील गावातून निश्चितच लोकांच्या माध्यमातून संधी प्राप्त होईल असे राजकीय वर्तुळातून बोलले जात आहे.
सोशल मीडियाद्वारे युवा नेतेआदिनाथ देशमुख यांना मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळत असल्यानेआणि चर्चेत आल्याने लोकांनाही आता त्यांच्या उमेदवारीविषयी उत्सुकता लागून राहिली आहे. यापूर्वी आदिनाथ देशमुख यांनी आपल्या संघटन कौशल्याद्वारे ग्रामपंचायत सदस्य ते सरपंच म्हणून अनेक लोकहिताची आणि विकासाची मोठ्या प्रमाणात कामाच्या माध्यमातून जनसंपर्क वाढवून विशेष करून जिल्हा परिषद सदस्य यांना जेवढी माहिती नसते ,एवढी माहिती जिल्हा परिषद च्या माध्यमातून गावपातळीवर असूनही केवळ गावाच्या विकासासाठी अभ्यासपूर्वक काम करत असल्याची भूमिका युवा नेते आदिनाथ देशमुख घेतात . अशी लोकांमध्ये चर्चा होत असल्याने करकंब जिल्हा परिषद गटातून मा.सरपंच व विद्यमान उपसरपंच आदिनाथ देशमुख यांनी निवडणूक लढवावी .अशी चर्चा ही या करकंब जिल्हा परिषद गटातील लोकातून होत आहे.