नाशिक,दि.१ :- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने विभागीय महसूल आयुक्त श्री. राधाकृष्ण गमे साहेब यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले..
निवेदनाचा आशय असा आहे की नाशिक महानगर पालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक 17 येथे डी.पी.डी.सी अंतर्गत आमदार निधीतून 56 लाख रुपये सांस्कृतिक भवन साठी निधी मंजूर झालेला आहे सदर भवनाचे काम सुरू करण्यात आले होते परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे सदर काम बंद आहे सदर कामात व्यत्यय आणणाऱ्या अधिकारी यांनी दलितांच्या हक्कावर गद्दा आणली आहे अश्या अधिकाऱ्यांवर हक्क भंगाची गुन्हा दाखल होऊन काम त्वरित सुरू न झाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे...!
हे निवेदन देतेवेळी रिपब्लिकन पक्षाचे उत्तर महाराष्ट्र नेते तथा महाराष्ट्र रत्न मा.अनिलभाई गांगुर्डे, उत्तर महाराष्ट्र प्रवक्ते मा.प्रमोदजी बागुल,जिल्हा उपाध्यक्ष मा.भास्करजी नरवडे,महानगर सरचिटणीस मा.चंद्रकांतभाई भालेराव,नाशिक जिल्हा उपाध्यक्ष मा.सुनिलभाऊ यशवंते,नाशिक शहर उपाध्यक्ष मा.शरद गायकवाड,मा.प्रकाशजी गायकवाड,मा.बॉबीभाई पागरे,युवा नेते प्रशांत गांगुर्डे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.