मध्य प्रदेश राज्यातील अल्पवयीन मुलीला पळवुन आणणारा पाच महीन्यापासुन फरार असलेला उसतोड कामगार आरोपीस अखेर करकंब पोलिसच्या मदतीने केले जेरबंद
करकंब पोलिसांची जोरदार कामगिरी
करकंब प्रतिनिधी:-
पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते मॅडम व अपर पोलीस अधिक्षक हिम्मतराव जाधव तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपुर विभाग विक्रम कदम यांचे मार्गदर्शनाखाली करकंब पोलीस ठाणेची हददीमधुन आरोपींचा शोध मोहीम घेणेबाबत आदेश देण्यात आलेले होते . सदर वेळी मध्यप्रदेश राज्यातील जिल्हा बडवाणी खेतिया पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर २२६/२०२१ भादविसं ३६३ वैगेरे मध्ये एका अल्पवयीन मुलीला अपरण करून ऑगस्ट महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये उस तोड कामगार बनुन करकंब पोलीस ठाणे हददीमध्ये राहत असल्याची माहीती प्राप्त झालेली होती . दिनांक ०१/०२/२०२२ रोजीच्या रात्रीच्या ऑलआउट ऑपरेशन दरम्यान पोलीस निरीक्षक निलेश तारु व करकंब पोलीस ठाणेचा स्टाफ रात्रगस्त व नाकाबंदी तसेच रेकॉर्डवरील आरोपींचा शोध घेत होते . आज पहाटे ०४ वा सुमारास नविन बांधकाम सुरु असलेल्या पोलीस ठाणे समोर मध्य प्रदेश पासिंगचे वाहन दिसताच करकंब शहर पेट्रोलींग डयुटीकरीता असणारे पोलीस हवालदार / आर आर जाधव व पोलीस नाईस / गायकवाड यांनी त्यांचेकडे विचारपुस केल्यानंतर सदरच्या वाहनामध्ये खेतिया पोलीस ठाणे जिल्हा बडवाणी राज्य मध्य प्रदेशचे पोलीस करकंब गावामध्ये पोलीस स्टेशनचा शोध घेत होते . त्यांना पोलीस हवालदार / जाधव यांनी पोलीस ठाणेस घेवुन माहीती विचारली असता खेतिया पोलीस ठाणे २२६/२०२१ भादविसं ३६३ वैगेरे मध्ये एका अल्पवयीन मुलीला अपहरण करून ऑगस्ट महीन्यापासुन महाराष्ट्रामध्ये आरोपी मुलीला घेवुन पळुन आला असून त्याचे मोबाईल टॉवर लोकेशन करकंब हृददीमध्ये दाखवत असल्याचे व त्याचा मालक संपर्कात असल्याची माहीती दिली . सदरच्या मध्य प्रदेश पोलीस यांना तात्काळ मदत देवुन सशस्त्र पथकासह करकंब पोलीस व मध्य प्रदेश पोलीस यांनी दोन पथकामध्ये लोकेशनवर जावुन शोध घेतला असता विजय घोडके रा.जाधववाडी रोड , करकंब यांचे शेतामध्ये उस तोडीसाठी आलेल्या टोळीमध्ये खोपटयामध्ये आरोपी असल्याची माहीती मिळाली असता लगेच त्या खोपटयास घेराव घालुन आरोपी बिजा उर्फ बसंत मदन भिल्ल रा . एकलअम्बा जि . बडवाणी राज्य मध्य प्रदेश याला पिडीत बालिकासह झोपेत असताना ताब्यात घेतले आहे . सदरच्या आरोपी व पिडीत बालक यांना मध्ये प्रदेश पोलीस सहाय्यक फौजदार व त्यांच्या पथकाने ताब्यात घेवून पुढील कारवाई करीता घेवुन गेलेले आहेत . सदरच्या कारवाईनंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश तारु यांनी करकंब परीसरातील सर्व टोळी चालक , मुकादम व शेतकरी यांना सुचित केले की , त्यांनी आणलेल्या पर राज्यातील उसतोड कामगार यांचे गुन्हेगार नसल्याची पडताळणी करावी , तसेच त्यांचेकडे असलेले उसतोड कामगार यांचे आधारकार्ड , फोटो याची माहीती ठेवणे बंधनकारक असुन उसतोड कामगारामध्ये बालकामगार ठेवल्यास कायदेशीर कारवाई होईल . तसेच आरोपींना आर्थिक मदत करणे व गुन्हयामध्ये मदत केल्यास कायदेशीर गुन्हा होत असुन त्यांचेवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल अश्या सुचना दिलेल्या आहेत . तरी आपल्या शेतामध्ये राहत असलेल्या टोळी मध्ये कोणी आरोपी , पिडीत किंवा बालकामगार नसल्याची खात्री करवी अन्यथा कायदेशीर कारवाई होईल . सदरची कारवाई करकंब पोलीस ठाणेचे
सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश तारु यांचे सह पोलीस हवालदार आर आर जाधव व पोलीस नाईक गायकवाड यांनी केलेली आहे *