4 लोकांच्या मृत्यूस कारणीभूत असलेला बोगस डॉक्टर पांडुरंग घोलप आधारवाडी जेल रवाना
*घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र मुणगेकर यांनी हाती घेतल्याने डुप्लिकेट औषध, इंजेक्शन विकणारे व इतर बोगस डॉक्टरांचे धाबे दणाणले*
मुरबाड दिनांक 1 प्रतिनिधी लक्ष्मण पवार
आरोग्य केंद्रात शिपाई म्हणून काम करून सेवानिवृत्त झालेल्या 68 वर्षीय इसमाने आपल्या राहत्या घरात चक्क दवाखाना थाटला आणि डॉक्टर बनला. त्या परिसरातील रुग्णांवर बिनधास्त दवाउपचार सुरू केला. शेवटी नको ते घडले आणि त्या बोगस डॉक्टरच्या चुकीच्या उपचारा मुळे निष्पाप 3 रुग्णांचा बळी गेल्याची खळबळजनक घटना मुरबाड तालुक्यात घडली आहे. तर अन्य एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती प्राप्त होत आहे
या खळबळजनक घटने बाबत टोकावडे पोलीस ठाण्यात बोगस डॉक्टर पांडुरंग घोलप यांच्या वर गुन्हा दाखल करण्यात आला असून टोकावडे पोलिसांनी त्यांना अटक केली असल्याची माहिती टोकावडे पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष दराडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
गु र क्र 13/2022 भा. दं. सं. कलम 420, 304 सह महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम 1961 कलम 33,(2)(अ), 33-अ,(2)(अ) प्रमाणे दाखल गुन्ह्याची हकीकत अशी की, फिर्यादी डॉ.उमेश विठ्ठल वाघमोडे , वय 34 वर्ष,व्यवसाय- वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र धसई,तालुका मुरबाड यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली की, पांडुरंग दगडू घोलप वय 68 वर्षे अंदाजे रा धसई यांनी त्यांच्या राहत्या घरी त्यांच्याकडे कोणताही वैद्यकीय परवाना नसताना वैद्यकीय व्यवसाय करून जनतेची फसवणूक केली आणि राम भिवा असवले वय 55 वर्ष व अलका रवींद्र मुकणे वय 22 वर्ष राहणार मिल्हे, आशा बुधाजी नाईक वय 30 वर्ष यांच्यावर चुकीचा दवा उपचार केला . त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. आरोपीकडे कोणताही वैद्यकीय परवाना नसताना त्यांनी वैद्यकीय उपचार करून नमूद इसमांच्या मरणास कारणीभूत झाला म्हणून दिलेल्या सरकार तर्फे फिर्यादीवरून आरोपी पांडुरंग दगडू घोलप वय 68 वर्षे अंदाजे रा. धसई तालुका मुरबाड यांच्यावर गुन्हा नोंद करुण त्याना नमुद गुन्ह्यात मुरबाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली टोकावडे पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष दराडे यांनी अटक़ केली आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. परडे आणि औषध प्रशासनाची टीम हजर
या घटनेची तात्काळ दखल जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. परडे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भारती बोटे आणि अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी घेऊन त्यांनी धसई प्राथमिक आरोग्य केंद्र व घटनास्थळी धाव घेऊन पोलिसांच्या सहकार्याने कार्यवाही केली.
अन्य बोगस डॉक्टरांची माहिती लोकांनी द्यावी जेणेकरून अशा दुर्दैवी घटना घडणार नाहीत - डॉ. भारती बोटे (तालुका आरोग्य अधिकारी)
या गंभीर घटने बाबत आरोग्य विभागाने टोकावडे पोलीस फिर्याद दाखल केली आहे. मुरबाड तालुक्यात असे बोगस डॉक्टर आढळल्यास नागरिकांनी आरोग्य विभागाला माहिती द्यावी तात्काळ कारवाई करण्यात येईल, जेणे करून अशा प्रकारची दुर्दैवी घटना घडणार नाही. सदर आरोपी ला दिवाणी न्यायाधीश मुरबाड यांनी 14 दिवसांची मॅजेस्टिक कस्टडी सुनावल्या ने त्याला आधारवाडी जेल कल्याण येथे रवाना केले आहे सदर घटनेचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र मुणगेकर यांनी हाती घेतल्याने डुप्लिकेट औषध इंजेक्शन विकणारे व इतर बोगस डॉक्टरांचे धाबे दणाणले आहेत