हिमायतनगर तालुक्यातील कारला येथील सोसायटी निवडणुकीत शिवसेनेचे 11 उमेदवार विजयी
हिमायतनगर प्रतिनिधी
कार्ला येथील सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक अतिशय रंगतदार व चुरशीची झाल्याने येथील 13 जागे पैकी 11 उमेदवार शिवसेना व तिसर्या आघाडीचे विजयी झाले ह्या सर्व विजयी उमेदवारांनी ढोल ताशांच्या गजरात विजयी मिरवणूक काढून आनंद साजरा केला
हिमायतनगर सोसायटी पाठोपाठ कार्ला येथे सुद्धा युवा सेना तालुका प्रमुख विशाल राठोड यांच्या नियोजनाखाली लढविण्यात आलेल्या पॅनलछा विजय झाला आहे त्यामुळे सर्व विजयी उमेदवारानी विजयी मिरवणूक काढून आनंद साजरा केला विजयी उमेदवाराचे भीमराव पाटील लुमदे . युवा सेना जिल्हाप्रमुख कृष्णा पाटील आष्टीकर. विलास वानखेडे. राम नरवाडे. जावेद शेवाळकर. यांच्यासह आदींनी शुभेच्छा देऊन सत्कार केला