हिमायतनगर येथील विदयार्थी उतरले रस्त्यावर..
हिमायतनगर प्रतिनिधी जांबुवंत मिराशे
दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात याव्या या मागणीसाठी आज दि.1 फेबुवारी रोजी श्री परमेश्वर मंदिर पासून तहसील कार्यालय पर्यंत भव्य रॅली काढून अनेक विद्यार्थ्यांनी नारे देत हिमायतनगर येथील तहसिलदार यांना ऑफलाईन पेपर रद्द करून ऑनलाईन पेपर घेण्यात यावे या मागणीचे निवेदन दिले व शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांना विनंती केली
हिंदुस्तानी भाऊ उर्फ विकास पाठक यांनी दिलेल्या हाकेला हिमायतनगर येथील विद्यार्थी संघटनांनी पाठिंबा देत महाराष्ट्राच्या शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांना तहसिलदार यांच्या मार्फत एक विनंती केली की यावर्षी होणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या माध्यमिक व उच्च माध्यमिकच्या परीक्षा ऑफलाईन न घेता 10 व 12 विच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात याव्या ह्यासाठी दि 1 फेबुरवारी 2022 रोजी तहसील कार्यालय परिसरात हिंदुस्थानी भाऊ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है,भारत माता की जय,ऑफलाईन पेपर रद्द झालाच पाहिजे असे नारे देत नायब तहसिलदार तामसकर साहेब यांना असंख्य विद्यार्थ्यांनी एक लेखी निवेदन दिले
यावेळी संदेश नरवाडे ,शुभम होळकर,परमेश्वर तोडकरी,वेदांत पालाकुडतेवार, प्रथमेश बिरकुरे,श्रीकांत ढोणे,नरेश शामलवाड,ओमकार भैरेवाड,निखिल बिजेवाड,लक्ष्मण टेकाळे,श्रीकांत मिरशे , आकाश ढोले,शुभम जककलवाड,नितीन बासे वाड,तेजस मुधोळकर,ऋषी मंदेवाड, सह आदी विद्यार्थी यावेळी उपस्थित होते