Type Here to Get Search Results !

लाचखोर ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात घरकुल चा तिसरा हप्ता मंजूर करण्यासाठी एक हजार रुपयाची स्वीकारली लाच

        लाचखोर ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात
घरकुलचा तिसरा हप्ता मंजूर करण्यासाठी एक हजार रुपयाची स्वीकारली लाच 
उमरखेड शहर प्रतिनिधी- तालुक्यातील जेवली या गांवातील घरकुल योजना मधील तिसरा हप्ता देयक करण्यासाठी लाभार्थ्यांकडून एक हजार रुपयांची लाच मागून आज प्रत्यक्ष स्वीकारल्या प्रकरणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात ग्रामसेवक अडकल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

सविस्तर वृत्त असे की, जेवली येथील लाभार्थ्याचे घरकुलाचे स्वप्न साकार झाले पण घरकुलाचा देय असलेला तिसरा हप्ता बँकेत जमा करण्यासाठी लाभार्थ्यांकडून एक हजार रुपयांची लाच मागितली. पात्र लाभार्थी यांचे कडुन पंचायत समिती मधील प्रधान मंत्री ग्रामीण आवास योजना , ग्रामीण गृहनिर्माण कक्ष ह्या ठिकाणी 31 जानेवारी सायंकाळी 5:00 च्या दरम्याण 1000/- हजार रुपयाची लाच घेताना जेवलीचे ग्रामसेवक संजय बाळकृष्ण पाडाळकर यांना यवतमाळ लाचलुचपत प्रतिबंधक पथकांने सापळा रचून पकडले.  
        आरोपी लोकसेवक संजय बाळकृष्ण पाडळकर ग्राम विकास अधिकारी यांनी पंचायत समिती कार्यालय उमरखेड येथे स्वतः करिता एक हजार रुपये लाच रक्कम तक्रारदार यांचेकडून पंचांसमक्ष कारवाईदरम्यान स्वीकारली असतात त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले पुढील तपास सुरू आहे सदरची कारवाई विशाल गायकवाड पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो अमरावती .परिक्षेत्र ,अरुण सावंत अप्पर पोलीस अधीक्षक अमरावती आणि पोलिस उपअधिक्षकक्षक शैलेश सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ोलीस निरीक्षक ज्ञानेश्‍वर नालट आणि अमलदार किरण खेडकर .अब्दुल वसीम .महेश वाकोडे . सचिन भोयर . राहुल गेडाम . आणि संजय कांबळे सर्व नेम नेमणूक अँटी करप्शन ब्युरो यवतमाळ यांनी केली .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad