Type Here to Get Search Results !

शहीद भाई कोतवाल चित्रपटाचा झेंडा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात

शहीद भाई कोतवाल चित्रपटाचा झेंडा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात
  
 2020/2021 चा सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून शहीद भाई कोतवाल सन्मानित
  मुरबाड दिनांक 01 प्रतिनिधी लक्ष्मण पवार

मुरबाड ,कर्जत तालुक्याच्या भूमीत घडलेल्या रक्तरंजित इतिहासावर आधारित तयार झालेल्या बहुचर्चित * शहीद भाई कोतवाल*' चित्रपटाचा झेंडा लागला आंतर्राष्ट्रीय चित्रपट महोत्सवात .
स्वरजाई आर्ट मिडीया प्रोडक्शन च्या चित्रपटास MIFF मध्ये मिळाले पाच ( अवार्ड ) पुरस्कार ...
मुंबई ' अंधेरी येथील मेयर ऑडिटोरीयम मध्ये झालेल्या आंतर्राष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वात जास्त पुरस्कार मिळवून २०२०-२१ चा शहीद भाई कोतवाल हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला .
१) सर्वोत्कृष्ट ऐतिहासिक चित्रपट 
निर्माता - प्रविण पाटील ,सागर हिंदुराव , सिध्देश देसले
२) सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन - एकनाथ देसले , पराग सावंत
3) सर्वोत्कृष्ट डि.ओ.पी - तुषार विभुते
४) सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शन - देवदास भंडारे
५ ) सर्वोत्कृष्ट डि .आय - वैभव वामन
सदर महोत्सवात अनेक कलाकार , तंत्रज्ञ ' राजकीय दिग्गजानी उपस्थिती दर्शविली . सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार दिवंगत निर्माते प्रविण पाटील यांच्या पत्नी मानसी पाटील यांनी स्विकारला .
चित्रपटाचे लेखक , दिग्दर्शक , गीतकार एकनाथ देसले यांनी चित्रपटा संदर्भात महोत्सवात माहिती दिली .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News