Type Here to Get Search Results !

डॉ.बाबासाहेब आंबेडकारांची पत्रकारीता व स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव परिसंवाद संपन्न

डॉ.बाबासाहेब आंबेडकारांची पत्रकारीता व स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव परिसंवाद संपन्न
माळशिरस, दि. १ :- प्रतिनिधी  लक्ष्मण पवार
 
 डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक हे वृत्तपत्र काढून 102 वर्ष झाल्यानिमित्ताने नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस (एन.डी.एम.जे) या संघटनेच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता व स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव या विषयावर अकलूज ता.माळशिरस जि.सोलापूर येथे परिसंवाद आयोजित केला होता. या ऐतिहासिक चर्चेत भीमराव चंदनशिवे सर, विकास दादा धाइंजे,विशेष सरकारी वकील ऍड.अमोल सोनवणे, ऍड.बापूसाहेब शिलवंत, प्रकाश काले, लंकेशवर, सुमित साबळे, रोहित एकमल्ली यांनी भाग घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता व आजची पत्रकारिता, आंबेडकरी चळवळीची स्थित्यांतरे, तत्कालीन पत्रकारिता व सद्यकालीन पत्रकारिता सकारात्मक चर्चा झाली. बाबासाहेबांना मूकनायक हे वृत्तपत्र काढण्यासाठी आलेल्या अडचणी, अग्रलेख, बातम्या, सदर, अभ्यास, आक्रमकपणा, लिखाणातील वैशिष्ट्य,मूकनायक ते बहिष्कृत भारत, समता, जनता व शेवटी प्रबुद्ध भारत इत्यादी वृत्तपत्रांवर सखोल संवाद झाला. एवढ्या प्रतिकूल परिस्थितीत बाबासाहेबांनी स्वतःचे उच्चशिक्षन चालू ठेवत वृत्तपत्रांमधून वर्तमान स्थिती अस्पृश्य समजल्या गेलेल्या समुदायाचे प्रश्न कशाप्रकारे सोडवता येतील याची उत्तरे आपल्या अग्रलेखातुन दिली आहेत. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव असताना बौद्ध, अनुसूचित जाती-जमातींच्या हक्काचा प्रगतीचा निधी अखर्चित ठेवला जातोय इतर विभागांना वळवला जातोय त्यामुळे मागासवर्गीय घटकांची प्रगती उन्नती होत नाही म्हणून बजेटचा कायदा झाला पाहिजे असेही परिसंवादात अधोरेखित झाले. आजही मागासवर्गी घटकास भेदभावास सामोरे जावे लागत असून बौद्ध, दलित आदिवासींवर माणुसकीला कालिंबा फासणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या घटना दररोज घडत असतात. आज सोशल मीडियासारखा महत्वपूर्ण मीडिया आपल्या हातात असताना आपण या मीडियाचा योग्य वापर करत नसून जर सोशल मीडियाचा योग्य वापर केला तर तर नक्कीच आमूलाग्र बदल घडेल असेही संवादकर्त्यांनी सांगितले. वक्त्यांनी अभ्यासपूर्ण विवेचन केले यामुळे संवादातून परिसंवाद घडला. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी व पत्रकारांनी चर्चेत भाग घेऊन असे कार्यक्रम प्रत्येक गावात,तालुक्यात,जिल्ह्यात झाले पाहिजेत असे डॉ.कुमार लोंढे, पत्रकार दत्ता नाईकनवरे, बाळासाहेब गायकवाड, डी.एस.गायकवाड यांनी सांगितले. तत्पुर्वी पहिल्या सत्रात लेखणीच्या साह्याने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पत्रकारांचा संविधानाची उद्देशिका भेट देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी ऍड.अमोल सोनवणे यांची उस्मानाबाद जिल्ह्यातील जळीत खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाल्याने सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने सन्मान करण्यात आला. तर दादासाहेब आखाडे सर यांची फळवणी या शाळेत मुख्याध्यापक पदी निवड झाल्याने प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. एन.डी.एम.जे संघटनेचे राज्य महासाचीव ऍड.डॉ.केवलजी उके यांच्या मार्गदर्शनात राज्य सचिव वैभव गिते यांच्या नेतृत्वात कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद शिंदे यांनी तर प्रास्ताविक वैभव गिते यांनी केले तसेच हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी एन.डी.एम.जे या संघटनेचे बाबासाहेब सोनावणे,वैभव काटे, धनाजी शिवपालक, अजिनाथ राऊत, येताळा खरबडे, सचिन झेंडे, दत्ता कांबळे, गणेश गायकवाड, भगवान भोसले, समाधान धांडोरे, शशिकांत गडहिंरे, संजय नवगिरे, अविनाश ताकतोडे, बबन नवगिरे, सिद्धार्थ सावंत, वासुदेव साठे, रतिलाल बनसोडे, समीर नवगिरे, अक्षय भागवत या सर्व कार्यकर्त्यांच्या विशेष प्रयत्नातून हा कार्यक्रम यशस्वी झाला शेवटी पंकज काटे यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News