तसेच अमेरीकन सरकार कडून शिक्षकांसाठी दिली जाणारी फुलब्राईट स्कॉलरशिप मिळाली होती त्यांना शैक्षणिक क्षेत्रातील अधिक सखोल अध्यायनासाठी अमेरिकेत जाणे गरजेचे आहे.परंतु सरकाराच्या उदासीनतेमुळे ती स्कॉलरशिप हातातून जाण्याची शक्यता आहे
यातच प्रशासनाच्या अडमुठे धोरणामुळे श्री. रणजितसिंह डीसले यांचा नोकरी सोडण्याचा विचार आहे गुरुजींनी ZP शाळा सोडली तर लाखो पगाराची नोकरी त्यांना कुठलीही संस्था देईल, पण सरकारी शाळेत डीसले गुरुजी असणं हे महाराष्ट्राच्या शैक्षणिक भविष्याची गरज आहे.
शिक्षणमंत्री यांनी सीईओ यांना डीसले गुरुजींना सुट्टी मंजूर करावी असे आदेश दिलेत म्हणून बातमी येतेय.
परंतु 25 तारीख ही डिसले गुरुजींची कागदपत्रे सबमीट करण्याची लास्ट डेट आहे. आज 22तारीख आहे उद्या रविवार सुट्टी आहे. सोमवार सायं 5 वाजेपर्यंत सर्व कागदपत्रांची पूर्तता प्रशासनाने करावी अन्यथा प्रशासनाला प्रंचड रोषाला सामोरे जावे लागेल
शिक्षणमंत्री, ग्रामविकासमंत्री, मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांनी याकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे. डीसले गुरुजींना तुमच्या बुके अन शालीपेक्षा आज खरी गरज आहे.
We support
धैर्यशील राजसिंह मोहिते पाटील
संघटन महामंत्री भाजपा,
सोलापूर जिल्हा