बेंबळे येथिल प्रगतशील बागायतदार सोमनाथ हुलगे यांनी को ८६०३२ या ऊस वाणाचे ११७ टन प्रति एकर उत्पादन घेवून जिल्ह्यात विक्रम केला आहे. हुलगे यांचे मार्गदर्शन व प्रेरणा घेवून विठ्ठलराव शिंदे कारखान्याच्या सभासदांनी शंभर टनाहून अधिक ऊस उत्पादनाचे ध्येय ठेवून शेती करावी, असे अवाहन जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह शिंदे यांनी हुलगे यांच्या १२५ टनाहून अधिक ऊस उत्पादन घेण्याच्या उद्दीष्ट असणाऱ्या प्रात्यक्षिक प्लॉटला भेट देत परीसरातील शेतकऱ्यांशी संवादादरम्यान केले.
सदर भेटी दरम्यान हुलगे यांचा प्रात्यक्षिक लागवडीच्या नंतरच्या सात महिन्यांमध्ये १८ ते २० कांड्यावर ऊस असून उद्दीष्ट पूर्तीकडे समाधानकारक वाटचाल सुरू असलेचे रणजितसिंह शिंदे यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी रणजितसिंह शिंदे यांनी हुलगे यांच्या शेतातील पूर्व हंगामी लागवड असलेल्या क्षेत्रातील ऊस तोडणी सुरू असलेल्या ५५ कांड्या च्या ऊसाबद्दल हुलगे यांच्याकडून व्यवस्थापनाबद्दल माहिती घेतली.
सदरप्रसंगी कारखान्याचे संचालक पोपट चव्हाण, ऊस विकास अधिकारी नारायण लगड, कृषी अधिकारी हनुमंत भोसले, गोविंद भोसले, प्रा मोहन भोसले, संजय पवार, तात्यासाहेब पवार, खंडूनाना पवार, जयवंत भोसले , सचिन शिंदे आदींसह कारखान्याचे अधिकाऱ्यांसह परीसरातील गावांतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.