Type Here to Get Search Results !

पंढरपूर शहरात गुटखा, मावा विक्री बिनदिक्कत सुरू, कोरोना वाढीस कारणीभूत जीवघेणे व्यसन

पंढरपूर शहरात गुटखा, मावा विक्री बिनदिक्कत सुरू, कोरोना वाढीस कारणीभूत जीवघेणे व्यसन
              अन्नभेसळ अधिकार्‍यांचे दुर्लक्ष

   प्रतिनिधी :- रफिक अत्तार

पंढरपूर शहरात सर्व नियम,कायदे कानून धाब्यावर बसवून राजरोसपणे गुटखा आणि आरोग्यासाठी अत्यंत घातक असणाऱ्या माव्याची विक्री विविध पानपट्टीवर सुरू आहे. सध्या संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर शहर व ग्रामीण भाग कोरोना संसर्गात आघाडीवर आहे. दररोज शेकडो रुग्ण सापडत असताना युवकांमधील गुटखा, मावा खाण्याचे व्यसन रोगराई वाढविण्यासाठी कारणीभूत ठरते आहे.राज्यात गुटखा विक्रीसाठी बंदी असूनही शेजारच्या कर्नाटक, व ईतर राज्यातून चोरीछुपे मार्गाने गुटखा, सुगंधित सुपारी असा माल येत आहे. कोरोना अजूनही पूर्णपणे गेलेला नाही,अनेक रुग्ण सापडत आहेत,या रोगाचा फ़ैलाव थुंकण्यातून सर्वात जास्त प्रमाणात होतो,शहरातील हजारो युवक कामधंदा नसल्याने व्यसनाधीन झालेले आहेत, मावा तयार करताना यात अत्यंत घातक केमिकल युक्त पदार्थांचा वापर केला जातो. माव्याची किक बसल्यानंतर अनेकांना सुरुवातीला वेगळा फिल येत असला तरी दीर्घकाळ सेवन केल्यास कँसर,भूक कमी होणे,रोगप्रतिकारक शक्तीचा ऱ्हास होऊन युवक वारंवार आजारी पडतात,यासाठी वापरली जाणारी सुपारी छातीत अडकल्यास मृत्यू देखील होऊ शकतो, तरुण वयात मावा दीर्घकाळ खाल्ल्यास नपुंसकत्व येऊ शकते, गुटखा  चघळल्यासही शुक्राणू कमी होऊन शक्ती कमी होते.सध्या पंढरपूर शहरात नावालाच गुटखा बंदी असून कानाकोपऱ्यातील सर्व पानपट्टी दुकानात मावा, गुटखा विक्री जोरात सुरू आहे,गावातील फुटपाथ, रस्ते,भिंती लालेलाल झाल्या असून यावरून युवकाच्यामध्ये किती व्यसनाधीनता वाढली आहे,हे दिसून येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News