Type Here to Get Search Results !

हिमायतनगर येथे भाजपचे नाना पटोले यांना जोडे मारो आंदोलन

हिमायतनगर येथे भाजपचे नाना पटोले यांना जोडे मारो आंदोलन

हिमायतनगर प्रतिनिधी जांबुवंत मिराशे
*काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देश्याचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांच्यावर टिका टिपन्नी केली  असल्याने  भाजप तालूका शाखेच्या वतीने जिल्ह्याचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर,  भाजपचे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगांवकर आमदार राम पाटील रातोळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली व तसेच भाजपचे तालुकाध्यक्ष आशिष सकवान यांच्या नेतृत्वात नाना पटोले यांचा जाहीर निषेध करत जोडे मारो आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी आशिष सकवान यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे  देशाचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांच्यावर जी अभद्र टिका टिपनी करीत आहेत. त्यांचे कृत्य सूर्याकडे पाहून थुंकण्यासारखे असून आपल्याच स्वतःच्या अंगावर , तोंडावर आपटण्यासारखे आहे. त्याचा सर्वस्वी धिक्कार करूण तीव्र निषेध नोंदवण्यात आला आहे. तसेच भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष राम भाऊ सुर्यवंशी यांनी जोडे मारून निषेध नोंदविला.

यावेळी भाजपचे  तालुकाध्यक्ष अशिष सकवान,   कांतागुरू वाळके,  सुधाकर पाटील, यलपा गुंडेवार रामभाऊ सुर्यवंशी, शहराध्यक्ष खंडू चव्हाण,  किशोर रायेवार,  अनूजाती मोर्चाचे अध्यक्ष दत्ता भाऊ शिराणे, नितीन मुधोळकर, ज्ञानेश्वर पंदलवाड,  संतोष कदम,  सुभाष माने, संदिप वानखाडे, हिदायत खान, विनायक ढोणे, राम जाधव,  बालाजी ढोणे, वामन मिराशे, सचिन कोमावार,  ज्ञानेश्वर माने, मनोज पाटील,  दिनेश राठोड,  बालाजी पोतरे,  बंडू बोंपीलवार,  गंगाधर मिरजगाव, सुरज चिंतावार,  हनुसिंग ठाकूर ,अनिल माने, प्रमोद भुसाळे,  अजय जाधव, महेश काळे,  प्रशांत ढोले, परमेश्वर सुर्यवंशी, परमेश्वर बनसोडे,  योगेश बोथिंगे,  दिनेश डुडूळे, तुकाराम कदम आदिंची प्रामूख्याने उपस्थिती होती


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News