Type Here to Get Search Results !

या गोष्टीला सतरा वर्ष होऊन गेली. त्यावेळीही साहेबांचे मरण चिंतणारे लोक होते आणि आजही आहेत

२००४ मध्ये शरद पवार साहेबांना कर्करोगाचे निदान झाले होते. त्यावेळी त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सल्ला दिला की “साहेब तुमच्याकडे सहाच महिने उरले आहेत.


 काही कागदपत्रे तयार करायची असतील तर करुन घ्या.” मात्र पवार साहेब खचले नाहीत. कर्करोगासारख्या दुर्धर आजाराशी त्यांनी जिद्दीने लढा दिला. प्रचंड इच्छाशक्ती आणि औषधोपचाराच्या जोरावर साहेब पूर्णपणे कर्करोगमुक्त झाले.

या गोष्टीला सतरा वर्ष होऊन गेली. त्यावेळीही साहेबांचे मरण चिंतणारे लोक होते आणि आजही आहेत. पण त्यावेळीही साहेबांनी आजारावर मात करुन वाईट चिंतणाऱ्या लोकांचे दात घशात घातले होते आणि आताही त्याचीच पुनरावृत्ती करतील. इथे द्वेष करणाऱ्या विकृतांपेक्षा प्रेम करणाऱ्या अगणित मायमाऊल्यांचे आणि गोरगरिबांचे आशीर्वाद साहेबांच्या पाठीशी आहेत...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad