Type Here to Get Search Results !

जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथे शूरवीर संभाजी करवर यांची जयंती साजरी : प्रदेश अध्यक्ष राज हटकर पाटील

जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथे शूरवीर संभाजी करवर यांची जयंती साजरी : प्रदेश अध्यक्ष राज हटकर पाटील
सुरुवातीला शुरवीर संभाजी करवर यांच्या प्रतिमेचे पूजन मा.राज हटकर पाटील प्रदेश अध्यक्ष व मा.रामराव पाटील सरपंच यांच्या हस्ते करण्यात आले. 
मान्यवरांनी आप आपले मत मांडले.
छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू अंगरक्षक शूरवीर संभाजी करवर यांची जयंती हटकर समाज महासंघ व ग्रामस्थ यांच्या वतीने साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक शुरवीर संभाजी करवर हे छत्रपती शिवाजी महाराजां पेक्षा सहा वर्षांनी लहान होते.14 जानेवारी 1636 रोजी. मकरसंक्रांतीच्या दिवशी जन्म झाला.ते लहानपणा पासुन चपळ होते.ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर स्वारीवर जात असंत. त्यांचा सहवास कर्नाटक मधील तंजावर,नाशिक जिल्ह्यात हिसवळ, सिन्नर भागात,तसेच रायगड परिसरात आणि जावळी दिंघची येथे हटकर वाडा म्हणून वास्तव्य आजही तेथे आहे. जिवाजी महाले आणि संभाजी करवर हे दोघे मित्र होते. त्यांचा एकत्र सहवास दिघंची येथे आढळून आलेला आहे. आज पण दिवाळीच्या पाडव्याला दिघंची येथे त्यांच्या समाधीस्थळी नैवेद्य दाखवला जातो. त्यांनी स्वराज्याच्या हितासाठी आपले योगदान दिले.यावेळी कार्यक्रमास मा.क्रुष्णा पाटील ग्रामसेवक, मा.दिलीप सुरवाडे,मा.रविंद्र पाटील, मा.नाना पाटील, मा.सोपान पाटील, मा.वासुदेव पाटील, मा.अशोक तुकाराम पाटील, मा.राजेंद्र भगवान पाटील, मा.भारत पाटील, मा.अमोल होडगरे, मा.समाधान शिप्पलकर,मा.प्रविण पाटील, मा.सोपान होडगरे,मा.सिध्दार्थ होडगरे,मा.शरद सोनवणे व गावातील प्रतिष्ठित ग्रामस्थ
 उपस्थित होते.
सदर कार्यक्रम आयोजित केल्या बद्दल हटकर समाज महासंघ महाराष्ट्र राज्य चे
संस्थापक/अध्यक्ष मा.भिमराव भुसनर, 
 प्रदेश कोअर कमिटी संचालक, मा.डॉ.शरद काळे साहेब
मा.चंद्रकांत पाटील जळगाव जिल्हा अध्यक्ष यांनी अभिनंदन केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मा.रविंद्र पाटील मा.सरपंच यांनी केले तर आभार प्रदर्शन मा.नाना पाटील यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad