प्रतिनिधी निगंनुर : मैनोदिन सौदागर
विविध योजना तसेच अन्य महत्त्वाच्या कागदपत्रांसाठी अत्यावश्यक असलेल्या आधार कार्ड लिंकिंग मेळाव्याचे आयोजना पोस्ट ऑफिसतर्फे १५ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे.
आपल्या आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, केंद्र व राज्य शासनाच्या सबसिडी व सर्व योजनांचा लाभ, वन नेशन वन राशन कार्ड, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे अर्ज अशा अनेक कामाकरिता आज आधार कार्ड आपल्या खात्याशी लिंक
असणे महत्त्वाचे आहे. याकरिता आधार कार्डचा इतरांकडून होणारा दुरुपयोग टाळण्यासाठी या आधार कार्ड मोबाइल लिंक करण्याचा मेळावा आयोजित करण्यात आल्याचे उपविभागीय डाक निरीक्षक हर्षद सोळंके पुसद व उप डाकपाल प्रसाद लाहाने फुलसावंगी यांनी सांगितले. निगंनुर पोस्ट अंतर्गत येणाऱ्या जवळपास आट गावांच्या नागरिकांनी या महामेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन पोस्ट ऑफिसचे पोष्टमास्तर आशरफ खाँन व कर्मचारी यांनी केले.यावेळी जि परीषद सदस्य पंकज मुडे सरपंच सुरेश बरडे उपसरपंच महेमुनिसाबेगम वलिउल्हाखाँन श्याम नखाते प्रमोद जैस्वाल. संदीप मुडे.रोहिदास राठोड. निशांत मुडे.बालाजी मुडे .पि सि भोळे .अविनाश राठोड तेजेस राठोड योगेश मुडे फारुख खाँन दिलावर खाँन विश्वभंर भोगांळे मुतालिब खाँन देविदास खंदारे शरद पंडागळे