महापालिकेच्या संत एकनाथ रंग मंदीरात आजवर अनेक नाटकं,कार्यक्रम झाली.. शहराची शान म्हणून एकेकाळी नाट्यग्रुह ओळखले जात होते,तीन वर्षांपासून ह्याची दुरुस्ती चालू आहे...आतां कोट्यावधी पैसा (10 कोटी) खर्चून जेव्हा ते दुरुस्त झाले आहे तर खाजगीकरणाची घाई कशाला?
खाजगीकरण करून प्रशासन जिम्मेदारीतून हात वर करत आहेत का? खाजगीकरण करायचे जर आधीच ठरले होते तर कोट्यावधी पैसा खर्च का केला?खाजगीकरण करून कलावंत आणि सर्व सामान्य नागरिकांना लुटण्याचा हा प्रकार आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा खाजगीकरणाला विरोध आहे,कुणाच्या तरी घश्यात घालण्यासाठी हे खाजगीकरण होतं आहे हे आम्ही होऊ देणार नाही,शहरातील नाट्य प्रेमींनी,कलावंतांनी आणि आपल्या प्रत्यकाच्या,हक्काच्या सरकारी जागेवर हक्क असणाऱ्या प्रत्येक नागरिकाने मनसेला उघड पाठिंबा दयावा ही नम्र विनंती.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली मागणी