Type Here to Get Search Results !

जिल्हा मध्यवर्ती बँकेत जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची पायमल्ली, ना तोंडाला माक्स ना सोशल डिस्टन्स

नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेत जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची पायमल्ली 
ना तोंडाला माक्स ना सोशल डिस्टन्स.
 दलालांमार्फत लवकरच कामे. मयत व्यक्तीस जिवंत दाखवून अनुदानाची उचल.

मागील वर्षी झालेल्या जास्त पावसाने शेतकऱ्याच्या तोंडचा घास गेल्याने. नुकसान भरपाई म्हणून शासनस्तरावरून शेतकऱ्यांना अनुदानाची घोषणा करण्यात आली. सदर अनुदान हे नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेतुन  दिले जात असून. संबंधित बँकेत दलाला शिवाय कामे होणे दुरापास्त झाले असून परिणामी शेतकऱ्याची अनुदान उचलताना मोठी हेळसांड होत आहे. प्रती खातेदार दोनशे ते पाचशे रुपये द्या व तात्काळ पैसे घेऊन जा . एवढ्यावरच न थांबता. मयत शेतकरी खातेदारास जिवंत दाखवून अनेकांचे अनुदान उचल केल्याचे शेतकरी बांधवा कडून बोलले जात होते. आमच्या प्रतिनिधीने खात्री करण्यासाठी दलालांमार्फत मयतच्या नावावरील  अनुदान उचलण्याचा प्रयत्न केला असता दलालांनी लागलीच होकार दिला.
येथील बँकेमध्ये कार्यरत असलेले दलाल व बँक कर्मचारी चक्क मयत व्यक्तीस सुद्धा जिवंत करून अनुदान उचलत आहेत.  तर दुसरीकडे वयोवृद्ध शेतकऱ्यांना तासन तास रांगेत उभे राहावे लागत आहे एवढेच काय तर जिल्हाधिकारी विपीन विटनकर यांनी कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता जिल्हाभरात कडक निर्बंध लागू केले असून शासकीय कार्यालयात पन्नास टक्के उपस्थिती तर शाळा महाविद्यालय 100% बंद करून कलम 144 लागू केलेले असताना नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेत मात्र स्वतः कर्मचारीच तोंडाला माक्स न लावता व्यवहार करत असल्याने शेतकरीसुद्धा अनुदान वाटपासाठी गर्दी करत आहेत .वास्तविकता अधिकारी-कर्मचारी हेच नियमाची पायमल्ली करत असताना शेतकऱ्याकडे कुठून अपेक्षा करणार

         हिमायतनगर प्रतिनिधी जांबुवंत मिराशे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News