Type Here to Get Search Results !

स्व. शिवरानीबाई बजरंगलाल जयस्वाल व नयन ऑप्टिकल्स यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य नेत्रतपासणी शिबीर संपन्न

स्व. शिवरानीबाई बजरंगलाल जयस्वाल व नयन ऑप्टिकल्स यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य नेत्रतपासणी शिबीर संपन्न

प्रतिनिधी निगंनुर :- मैनोदिन सौदागर 

 उमरखेड तालुका अंतर्गत येत असलेल्या निंगनुर या ग्रामीण भागात पहिल्यांदाच भव्य दिव्य अशा स्वरूपामध्ये नेत्र तपासणी शिबिर संपन्न झाले आहे. त्या शिबिरामध्ये डोळे लाल होणे, नेहमी डोके दुखणे,डोळ्यातून पाणी येणे,दूरचे व जवळचे बरोबर न दिसणे, डोळ्यासमोर काजवे चमकणे, डोळे खरळणे, डोळे चिपडने, मानेची शिर दुखणे, डोळ्यात टिक, पडदा, नासूर, अश्या बऱ्याच वेगवेगळ्या स्वरूपात डोळ्याची तपासणी करण्याचे शिबीर निंगनुर मध्ये पहिल्यांदाच संपन्न झाले.
नेत्र शिबीर गावामध्ये संपन्न झाल्याने गावामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.या शिबीराला सौम्य वाईन बार यांचे सौजन्य लाभले असून, या शिबिराची नोंदणी ही जय महाकाली मेडिकल यांच्याकडे करण्यात आली.यामध्ये गावातील_इत्यादी लोकांनी नेत्र तपासणी शिबिराचा लाभ घेतला घेतला.या तपासणीसाठी डॉक्टर विशेष नेत्ररोग व नेत्रशल्य चिकिस्तक डॉ.स्वप्निल शिंदे,व नेत्र चिकिस्तक डॉ. संतोष शिंदे हे लाभले होते.
यावेळी गावातील जिल्हा परिषद सदस्य पंकज मुडे सरपंच सुरेश बरडे, उपसरपंच मेहमुनिसाबेगम वलीउला खान ,प्रशांत जयस्वाल, इम्रान खान, देविदास खंदारे, भारत ठाकूर, सुनील बरडे प्रविण जैस्वाल ,मुरलीधर राठोड, ब्रिजूलाल मुडे,बालाजी मुडे ,बालाजी महाले, संदिप मुडे रोहिदास राठोड. डॉ सुनील बरडे.अंकुश राठोड,नईमअली नवाब, फारूक खान, पी.सी.भोळे दादाराव गव्हाळे ,मंगेश राठोड,अमोल काळे. संदीप वाघमारे, सचिन जाधव, चंद्रकांत बरडे योगेश मुडे ,पत्रकार संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष मारोती गव्हाळे, तालुका सचिव मैनुदिन सौदागर, गजानन नावडे. आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad