प्रतिनिधी निंगनूर.मैनोदिन सौदागर
उमरखेड तालुक्यातील अति दुर्गम भाग म्हणून ओळखले जाणारे निगंनुर येथील गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या पुजांराम माधव बरडे यांच्या घरी घटनास्थळ पंचनामा करण्यासाठी मगळवारी दि. २५ जानेवारी रोजी नायब तहसीलदार काशीनाथ डांगे, मंडळ अधिकारी सचिन फटाले, ग्रामसेवक विनोद चव्हाण. सरपंच सुरेश बरडे, उपसरपंच मेहमुनिसाबेगम
वलिउल्हाखाँन, तलाठी विलास धुळधुळे, प्रकाश कानडे,,पोलीस पाटील उत्तम मुडे.बिरजुलाल मुडे. कोतवाल विश्वंबर भोगाळे, संतोष जाधव .डॉ सुनील बरडे.राजु बरडे. विजय देवकते.डॉ सुधीर तायडे.रामराव कांबळे. मैनोदिन सौदागर.मुतालिब. खाँन. समदखाँन.ग्रामपंचायतचे सर्व कर्मचारी यांच्या उपस्थितीत घटना स्थळाचा पंचनामा करण्यात आला. आत्महत्याग्रस्त कुटुंबास शासनाकडून सर्वतोपरी मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.