Type Here to Get Search Results !

लोणी मंचर रस्त्यावर भरधाव जाणाऱ्या चार चाकी वाहनाचा आरसा डोक्यात लागल्याने नऊ वर्षीय मुलीचा मृत्यू

दि :२६/०१/२०२२.
 प्रतिनिधी - कैलास गायकवाड
जारकर वाडी (ता.आंबेगाव) येथील लोणी मंचर रस्त्यावर भरधाव जाणाऱ्या चार चाकी वाहनाचा आरसा डोक्यात लागल्याने नऊ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला असल्याची दुःखद घटना दिनांक 25/1/2022 रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या अपघातात तनिष्का नवनाथ ढोबळे वय 9 रा.जारकर वाडी घोडखाना ता.आंबेगाव पुणे ) या मुलीचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी नवनाथ महादू ढोबळे यांनी फिर्याद दिली असून वाहन चालक शरद बन्सी थोरवे रा. शिरोली बुद्रुक ता. जुन्नर जिल्हा पुणे याच्यावर मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    याबाबत सविस्तर माहिती अशी की दिनांक 25/1/2022 रोजी फिर्यादी शरद नवनाथ ढोबळे यांची मुलगी तनिष्क ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढोबळे वाडी येथून पिकअप मधून बसून दुपारी तीन वाजेच्या दरम्यान घरी येत असताना घरा जवळील रोडवर आली होती पिकअप गाडीतुन उतरल्यानंतर पिकपच्या मागच्या बाजूने घराकडे येण्यासाठी रस्ता ओलांडत असताना तिला भरधाव येणाऱ्या हुंडाई क्रेटा एम.एच.14 एच.क्यू 8199 या वाहनाचा आरसा मुलीच्या डोक्यात जोरात लागल्याने अपघात होऊन या अपघातात झाला होता. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी ती मयत झाल्याचे सांगितले. याबाबत मंचर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक खैरे करत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad