हदगाव तालुक्यातील मौजे कोळी येथे मनाठा युवक कांग्रेस सर्कल प्रमुख तथा कोळी येथिल तंटामुक्ती अध्यक्ष गंगाधर पाटील कोळीकर यांच्यावतीने आगामी जिल्हापरिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डख पाटील यांचे शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील हवामान व हरभरा पिकाच्या उत्पादन वाढीसाठी हनुमान मंदिर कोळी येथिल प्रांगणात भव्य शेतकरी मेळावा व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन हदगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार माधवराव पाटील जवळगावकर व हवामान तज्ञ पंजाबराव पाटील डक यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते
प्रथम जिजामाता चौक येथे जिजामातेच्या प्रतिमेला आमदार माधवराव पाटील जवळगावकर व हवामान तज्ञ पंजाबराव पाटील डक यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुण आमदार माधवराव पाटील जवळगावकर व हवामान तज्ञ पंजाबराव पाटील डक यांचे कोळीकरांनी फटाक्यांच्या आतषबाजित व ढोलताशांच्या गजरात भव्य स्वागत करूण सजवलेल्या बैलगाडीतून मिरवणूक काढुण कार्यक्रम स्थळी रवाना कले
प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेच मान्यवरांच्या हस्ते पुजन करुन आयोजक गंगाधर पाटील कोळीकर यांनी आमदार जवळगावकर व हवामान तज्ञ पंजाबराव पाटील डक यांचा सत्कार केला
तर कोळी ग्रामस्थांच्या वतिने गावचे प्रथम नागरीक सरपंच प्राध्यापक संजिव कदम यांनी उपस्थित मान्यवरांचा सन्मान केला
यानंतर आमदार माधवराव पाटील जवळगावकर व हवामान तज्ञ पंजाबराव डक पाटील यांनी उपस्थित शेतकरी बांधवांना मोलाचे मार्गदर्शन केले
यावेळी परिसरातील शेतकरी बांधवांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली होती
या कार्यक्रमाचे आयोजन मनाठा युवक काँग्रेसचे सर्कल प्रमुख तथा तंटामुक्ती अध्यक्ष गंगाधर पाटील कोळीकर यांनी केले तर सुत्रसंचालन व आभार अरुणकुमार क्षिरसागर यांनी व्यक्त केले
यावेळी कांग्रेसचे तालुका अध्यक्ष आंनद भंडारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष विनायक क्षिरसागर,,सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष आनिल पवार, सरपंच संघटनेचे उप जिल्हाध्यक्ष विलासराव चव्हाण, कैलास पाटील नेवरीकर, शंकरराव पाटील मनाठकर, बाला पाटील भाटेगावकर, पोलीस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष डिगांबर कदम पाटील व इतर कार्य करते उपस्थित होते