चुरशीच्या लढतीत बहुमताने विजय
प्रतिनिधी निंगनूर : -
येथील जि. प.उच्च प्राथमिक मराठी शाळेच्या अध्यक्ष पदी येथील देविदास साहेबराव खंदारे तर उपध्यक्ष पदि रोहिदास काळु राठोड यांना बहुमतांनी विजय मिळाला असून त्यांची पुढील दोन शैक्षणिक वर्षा साठी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.
एखाद्या ग्राम पंचायत निवडणुकांना शोभावा अशा वातावरणात येथील जि. प.केंन्द प्राथमिक मराठी शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या निवडणुक काल पार पडल्या
अतिशय चुरशी च्या व ओढाताण चालू झाल्या कारणाने बिटरगांवचे ठाणेदार प्रताप भोस आपल्या ताफ्या सह हजर झाले होते .अगोदर फक्त दोन पोलिस कर्मचारी बंदोबस्त करण्यासाठी होते बिटजमादार गजानन खरात व पोलीस शिपाई दत्ता कुसराम या निवडणुकीत चोख बंदोबस्त लावण्यात आला होता .४ जानेवारी रोजी सर्व पालक वर्गातून शाळा समिती च्या सदस्य निवड प्रकिया पार पडली ज्या मध्ये ६ महिला पालक सदस्य व ७ पुरुष सदस्य निवड करण्यात आली.तर काल ४ जानेवारी रोजी या १३ सदस्यांमधून अध्यक्ष निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.अध्यक्ष पदाला गावातील काही मंडळींनी प्रतिष्ठेचा विषय केल्याने त्यात निगंनुर चे चांगलेच राजकीय वातावरण ढवळून निघाले.अक्षरशः सदस्य फोडण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे बोलल्या जात आहे.
शेवटी ४ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता अध्यक्ष पदा साठी मतदान प्रक्रिया करण्यात आले ज्या मध्ये 8 मतदान घेऊन येथील सामाजिक कार्यकर्ते देविदास खंदारे यांना अध्यक्ष पदाच्या निवडीत विजय घोषित करण्यात आले व रोहिदास काळू राठोड उपाध्यक्ष पदी बहुमतांनी विजय झाले आहेत.ही निवडणूक आशा वेळी झाली आहे ज्या वेळी ही शाळा कमी शिक्षक, नसल्याने सर्वत्र पसरलेली अस्वच्छता ,
नशाधीन व्यक्तींचे मुक्त संचार अशा विविध समस्याना तोंड देत आहे.नवीन कार्यकारीणी ह्या समस्या वर कश्या प्रकारे मात करते ह्या कडे नागरिकांच्या नजरा लागल्या आहे.ग्रामपंचायत सदस्य पिंकू बाळू जाधव शिक्षक प्रतिनिधी एस एम काठोले शिक्षण तज्ञ तेजेस राठोड माधुरी सुरेश पंडागळे सुलताना परविन सरफराज नवाब प्रनिता राजूसिंग मुडे लक्ष्मी शंकर शेळके राजूसिंग बळिराम मुडे सेवंता प्रकाश राठोड पुष्पा मारोती वायकुळे प्रविण गोकुळ मुडे संजय हारी बरडे
यावेळी जिल्हा परिषद सदस्य पंकज मुडे सरपंच सुरेश बरडे उपसरपंच मेहमुनिसाबेगम वलिउल्हाखाँन तर मुख्याध्यापक व्हि के चौधरी पि के मुजांळ एस के चिभडे पि बि पवार आर एच फुलेवार सहशिक्षक म्हणून कुंभरवार सर मांजरे सर उमर सर गावातील नागरिक प्रमोद जैस्वाल. अविनाश राठोड. बालाजी मुडे.सुरेश मुडे.मागीलाल राठोड पि सि भोळे इमरानखाँन नयुम नवाब गजानन नावडे मारोती गव्हाळे बालाजी माहाले .अंकुश राठोड रंगराव वायकुळे शरद पंडागळे विनोद गव्हाळे. प्रल्हाद महाराज फारुक अली नवाब संदीप मुडे आदिंची उपस्थीती होती .