हिमायतनगर प्रतिनिधी :- जांबुवंत मिराशे
शासकीय विलनीकरणाच्या मागणीसाठी राज्यातील एसटी कर्मचारी संपावर गेले आहेत यातच नांदेड जिल्ह्यातील हदगाव आगाराचे एसटी कर्मचारी देखील सहभागी आहेत
दरम्यान सरकारकडून देण्यात आलेल्या अल्टिमेटम संपला असून संपकरी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे.
दरम्यान यातच आज नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथील एसटी आगारामध्ये संपावर असलेल्यां काही कर्मचार्यांपैकी आज कामावर रुजु झालेल्या कर्मचार्यांना सोबत घेऊन एस टी प्रशासनाने पोलीस संरक्षण घेऊन हदगाव बस स्थानकातून आज दुपारी 12 वाजून 30 मिनिटांनी हदगाव ते नांदेड हि पहिली बस फेरी धावली
सध्या स्थितित एक चालक व एक वाहक कामावर रुजू झाले आहेत
त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून चालू असलेले सर्वसामान्य प्रवाशांचे हाल कुठेतरी थांबतील अशी आशा पल्लवित झाली आहेत.
हदगाव आगारामध्ये पेक्षा जास्त एसटी कर्मचारी असून त्यापैकी काही कर्मचारी आज आपल्या पोटाची खळगी भरत नसल्याने आज गुरुवारी कामावर रुजु झाले
दिर्घ प्रतीक्षेनंतर लालपरी रस्त्यावर धावल्याने या बस फेरीला प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिला यावेळी शालेय विद्यार्थी , जेष्ठ नागरिक व महिला प्रवाशी या बसमधून नांदेड कडे मार्गस्थ झाले
शाळकरी विद्यार्थी ,जेष्ठ नागरिक व अंपग प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे