प्रतिनिधी :- जांबुवंत मिरासे
सदरील उपोषणास कार्ला येथील उपसरपंच रोशन धनवे यांनी भेट देऊन भ्रष्टाचारी ग्रामसेवकाची सखोल चौकशी करून कार्यवाही करावी अशी मागणी करून उपोषणास पाठिंबा दर्शविला आहे. याच बरोबर तालुक्यासह कारला येथील अनेक नागरिकांनी उपोषणास पाठिंबा दर्शविला आहे
शरीरात रक्ताचा थेंब असेपर्यंत उपोषण करणार असल्याचे उपोषण करते रामदास ईटेवाड व तुकाराम कदम यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले पुढे बोलताना म्हणाले की या भ्रष्टाचारी ग्रामसेवकाची राजकीय दबावापोटी पाठराखण करण्यात येत असून या सर्व बाबीची सखोल चौकशी करून चौकशी अहवाल देण्यात यावा यासाठी उपोषण चालवले असून लोकशाही मार्गाने चालत असलेल्या उपोषणास बर्याच लोकप्रतिनिधी पाठिंबा दर्शवला असून वेळप्रसंगी न्यायालयात दाद मागावी लागणार असल्याचे बोलताना सांगितले