Type Here to Get Search Results !

शिवसेनेच्यावतीने महाराष्ट्र पोलीस दिनानिमित्त फलटण तालुका पोलीसांना शुभेच्छा

शिवसेनेच्यावतीने महाराष्ट्र पोलीस दिनानिमित्त फलटण तालुका पोलीसांना शुभेच्छा : प्रदिप झणझणे, शिवसेना फलटण तालुका प्रमुख
फलटण प्रतिनिधी,
  जानेवारी १९६१ रोजी महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना करण्यात आली. महाराष्ट्र हे आकारमानाच्या दृष्टीने देशातील तिसरे सर्वात मोठे राज्य आहे. राज्यात एकुण 36 जिल्हे असून "महाराष्ट्र पोलीस" महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था हाताळत आहेत. 2 जानेवारी रोजी महाराष्ट्र पोलीस दलाचा 59 वा वर्धापन दिन. या ऐतिहासिक दिनानिमित्त फलटण पोलीसांच्यावतीने फलटण शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सन्माननीय श्री.भारत किंद्रे यांचा शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांनी फलटण तालुका शिवसेनेच्यावतीने जाहीर सत्कार करुन "ऑन ड्यूटी 24 तास" अविरत सेवा देणा-या फलटण तालुक्यातील पोलीस दलामधील अधिकारी व कर्मचाऱ्यांना हार्दिक शुभेच्छा देऊन फलटण तालुक्यातील नागरिकांच्यावतीने कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी फलटण शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भारत किंद्रे यांचेसह, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश अरगडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपाली गायकवाड, तसेच कांबळे, नितीन भोसले, शरद तांबे, महिला पोलीस कर्मचारी तांबे, गणेश यादव आदी उपस्थित होते. 

तसेच शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे, ज्येष्ठ शिवसैनिक व ग्राहक संरक्षण कक्षाचे उप शहर प्रमुख भारतशेठ लोहाना, माथाडी कामगार तालुका प्रमुख नंदकुमार काकडे, शिवसेना उपशहर प्रमुख राहुल पवार, ओंकार सरगर आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad