ईस्लापूर येथील ग्रामपंचायतच्या सभागृहात सावित्रीबाई फुले, यांची जयंती साजरी करण्यात आली. ईस्लापुर ग्रामपंचायत सरपंच सौ.शारदाबाई शिनगारे, यांच्या हस्ते सर्वप्रथम प्रतिमेचे पूजा अर्चा करुन अभिवादन करण्यात आले.
ग्रामपंचायत सभागृहात सावित्रीबाई फुले, यांची जयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चरित्रावर गटपाळे गुरुजी, हे बोलत होते की सावित्रीबाई फुले, आणि महात्मा ज्योतिराव फुले, यांनी सन.१८४८ मध्ये पुण्यातील भिडे, वाड्यात मुलींसाठी शाळा सुरू करून देशात स्त्री शिक्षणाचा पाया रचला सन १८४८ ते १८५२. या कालावधीत सावित्रीबाईंनी पुणे आणि परिसरात १८, शाळा स्थापन केल्या असे सांगीतले. त्यावेळी ग्रामविकास अधिकारी गर्दसवार,उपसरपंच निर्मलाबाई दुरपडे, ग्रामपंचायत सदस्य नारायण दंतलवाड, उत्तम चव्हाण ,निर्गुन पाटील ,पत्रकार पेशवे, कांबळे, प्रमोद जाधव, किरण वानखेडे, रावसाहेब कदम, आंबेकर .आदि. पत्रकार व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते...