फलटण दि. २२ : फलटण तालुका सहकारी दूध पुरवठा संघाच्या चेअरमनपदी धनंजय सखाराम पवार, राजुरी आणि व्हा. चेअरमनपदी दत्तात्रय परशुराम रणवरे, जिंती यांची फेर निवड करण्यात आली असून संघाच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली आहे.
नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या पहिल्या बैठकीत वरील प्रमाणे चेअरमन व व्हा. चेअरमन निवड बिनविरोध करण्यात आली, संचालक मंडळ बैठकीच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक निबंधक (सहकारी संस्था फलटण) सुनील धायगुडे होते.
महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आ. दिपक चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समिती चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, पंचायत समिती सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांच्या सह अनेकांनी नवनिर्वाचित चेअरमन, व्हा. चेअरमन व संचालक मंडळाचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान संघाच्या चेअरमनपदी काम करण्याची दुसऱ्यांदा संधी दिल्याबद्दल धनंजय पवार व त्यांचे राजुरी व परिसरातील सहकारी सर्वश्री विलासराव नलवडे , माणिकराव सोनवलकर , रामचंद्र निगडे , लक्ष्मण सोनवलकर , जयकुमार इंगळे, भास्करराव घोलप, रामचंद्र लावंड (गुरुजी), आण्णासाहेब जाधव ,कांतीलाल खुरंगे ,सरपंच सचिन पवार, सोमनाथ गावडे , पोपट साळुंखे, राजेंद्र पवार, पोपटराव हगारे , रमेश बागाव ,, विजय गायकवाड , राजेश पोळ ,माऊली जाधव , मफतलाल पवार , शिवाजी पवार , दादा खांडे आणि तरुण कार्यकर्ते यांनी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आ. दीपक चव्हाण, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांचा राजूरी पंचक्रोशीच्यावतीने शाल, श्रीफळ, पुष्पहार घालुन यथोचित सत्कार केले.
यावेळी नवनिर्वाचित संपूर्ण संचालक मंडळ व दुध उत्पादक शेतकरी उपस्थित होते.