Type Here to Get Search Results !

वृद्ध पती पत्नीच्या दुहेरी हत्याकांडाने भिवंडी तालुक्यात खळबळ

वृद्ध पती पत्नीच्या दुहेरी हत्याकांडाने भिवंडी तालुक्यात खळबळ
भिवंडी तालुक्यातील अकलोली गावाच्या हद्दीतील पेंढारीपाडा येथे राहणाऱ्या वयोवृद्ध पती पत्नीची राहत्या घरातच निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या दुहेरी हत्याकांडामुळे भिवंडी तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. 

 बाळू पाटील सह त्यांच्या पत्नीची निर्घृण हत्या झाल्याची घटना आज सकाळ्च्या सुमारास उघडकीस आली आहे. तर घटनेची माहिती   गणेशपुरी पोलीस पथकाला मिळताच घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करीत दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात रवाना करून अज्ञात मारेकऱ्यांविरोधात गणेशपुरी पोलीस ठाण्यात दुहेरी हत्येचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी  तपास सुरू केला. धक्कादायक बाब म्हणजे हत्याकांडावेळी घरातील टीव्ही सुरु होता. दोघांचे मृतदेह रक्तच्या थारोळ्यात पडल्याचे आढळून आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad