पारदर्शक कारभारामुळे उच्चांक स्थान मिळवेल;- चेअरमन अभिजीत पाटील
प्रतिनिधी :- रफिक आतार
भाळवणी येथे DVP दि पिपल्स मल्टीस्टेट यानवीन शाखेचे उदघाटन सोलापूर जिल्ह्याचे मा.आमदार श्री.दीपक आबा साळुंखे-पाटील, धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. उत्कृष्ट व पारदर्शक कारभारामुळे जनमानसात मल्टीस्टेटने विश्वासाचं नातं निर्माण केले आहे. त्याच विश्वासाच्या जोरावर भाळवणी येथील देखील मल्टीस्टेट उच्चांक स्तरावर जाईल असा विश्वास अभिजीत पाटील यांनी व्यक्त केला. मा.संचालक श्री.इस्माईल गुरुजी मुलाणी, मा.संचालक श्री.हरिभाऊ शिंदे, श्री.जयराम शिंदे, व्हाईस चेअरमन श्री.शरद अडगळे, भाळवणीचे सरपंच श्री.विठ्ठल चौगुले, उपसरपंच श्री.दीपक गवळी, ग्रामपंचायत सदस्य श्री.सुनिल पाटील, पत्रकार श्री.नितीन शिंदे, श्री.सद्दाम सय्यद, हभप तात्या महाराज भाळवणीकर, श्री.सलीम काझी, श्री.शिवाजी बाबर,
धाराशिव साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री.अमर पाटील साहेब, संचालक श्री.अभिजीत कदम, श्री.दिनेश शिळ्ळे, श्री.जयंत सलगर, मल्टीस्टेट चेअरमन श्री.संदेशकुमार दोशी, श्री.सुरज पाटील यासह संचालक मंडळ यासह आदी मान्यवर उपस्थित होते.