हिमायतनगर तालुक्यातील मौजे सिरंजनी येथे आज दिनांक 20 डिसेंबर रोजी स्वछता अभियानाचे जनक, राष्ट्रसंत, वैराग्यमूर्ती गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी निम्मित छत्रपती शिवाजी महाराज चौक सिरंजनी येथे समस्त समाज बांधव तसेच गावकर्यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले असून सदरील कार्यक्रमाला गावातील प्रतिष्ठित नागरिक तथा धोबी समाज बांधव उपस्थित होते.
वैराग्यमूर्ती राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी दरवर्षी सिरंजनी येथे करण्यात येते याही वर्षी सर्व समाज बांधव व गावचे प्रथम नागरिक सरपंच पवन करेवाड तसेच इतर मान्यवर मंडळी उपस्थित राहून संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रसंगी सरपंच पवन करेवाड यांनी लवकरच गाडगे बाबा यांच्या पुतळ्याची उभारणी करून सुशोभीकरण करून देऊ असे आश्वासन दिले.
प्रसंगी सिरंजनी येथील जेष्ट नागरिक पुरी महाराज जयवंतराव देशमाने, मारोती जरगेवाड, मारोती भींबरवाड, परमेश्वर गंपलवाड, रामल्लू जरगेवाड, आक्केमवाड, चंपती भद्देवाड, मारोती पवार, दत्ता उप्पलवाड, गणेश जाधव, दशरथ देशमाने,नवनाथ देशमाने. भाटे, समाधान म्याकलवाड, बालाजी देशमाने, सदेवाड सह गावकरी मंडळी उपस्थित होते.