प्रतिनिधी :- रफिक आतार
पंढरपूर.येथे श्री गाडगे महाराज यांची 65 वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. प्रसंगी प्रशालेच्या विद्यार्थिनींनी स्वागतगीत सादर केले. मान्यवरांच्या हस्ते गाडगे महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. प्रशालेचे श्री पाटकर सर यांनी गाडगे बाबांचे फटका गीत सादर केले.
यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री कापसे सर व पाहुण्यांचा परिचय घोडके सर यांनी करून दिला. प्रगती हस्तलिखित अंकाचे संपादकीय मनोगत सौ अलका ओंबासे मॅडम यांनी केले. प्रगती हस्तलिखित 2021 अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री नागेश फाटे (प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उद्योग व व्यापार), कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या मा.श्रीम.प्रा.सविता दूधभाते मॅडम (उमा शिक्षण महाविद्यालय पंढरपूर)श्री सुधीर धोत्रे( नगरसेवक विरोधीपक्ष न.पा.पंढरपूर), श्री कल्याण कुसूमडे (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रदेश सचिव, उद्योग व व्यापार विभाग ) श्री दिलीपरावजी पाचंगे साहेब,संचालिका सौं. चंद्रकला ताई पाचंगे मॅडम, मुख्याध्यापक श्री हरिदास मगर सर, श्री सातपुते महाराज व दीक्षा शिरसागर, प्राजक्ता घोडके या विद्यार्थिनींनी यांनी गाडगेबाबांचे सामाजिक, शैक्षणिक कार्य विषयी आपले मनोगत व मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री केशव ठाकरे व कार्यक्रमाचा समारोप श्री वेरुळकर सर यांनी केला. कार्यक्रमाची सांगता श्री पाटसकर सर यांनी गाडगे बाबांचे पसायदान गाऊन केले. यानंतर प्रशालेतील सर्व विद्यार्थिनींना स्नेहभोजन देण्यात आले.प्रसंगी प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व माजी शिक्षक व पालक व सर्व विद्यार्थिनीनी उपस्थित होत्या.