प्रतिनिधी :- रफिक आतार
पंढरपूर : पंढरपूर शहरातील लहान बालकांच्या विविध आजारावर योग्य उपचार करणारे प्रसिद्ध डॉक्टर शितल के शहा यांच्या नवजीवन चिल्ड्रन्स हॉस्पिटल येथे लहान मुलांचे विविध आजार यामध्ये बाळ निळसर पडणे,वजन वाढणे,जोरजोरात श्वास चालणे,दूध व्यवस्थित न पिणे,दूध पिताना कपाळावर घाम येणे,वारंवार निमोनिया होणे त्याचबरोबर नेहमी आढळणारे एएसडी,पीडीए, व्हीएसडी अशा आजाराची लक्षणे दिसून येत असल्यास पालकांनी मोफत शिबिरामध्ये नाव नोंदणी करावी.
बाळाला जन्मताच हृदयाचे असलेले छिद्र, ओपन हार्ट शस्त्रक्रिया न करता डिवाइस तंत्रद्वारे कायमचे बंद केले जाते, डॉक्टर शितल शहा यांच्या नवजीवन हॉस्पिटल मध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत असलेल्या सुविद्या मध्ये या सर्व सुविधा मोफत करण्यात येतात. नवजात अभ्रकाचे (पूर्ण व कमी दिवसात जन्मलेल्या) सर्व प्रकारचे गंभीर आजार, नवजात बालकाची कावीळ व उपचार, हृदयरोग, फुफुसाचे आजार,किडनीचे आजार,मेंदूचे आजार व उपचार तसेच नवजात व लहान मुलांच्या शस्त्रक्रिया आदी तज्ञ डॉक्टरांकडून मोफत निदान व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार पद्धती द्वारे करण्यात येते. रुग्णांसाठी एक दिवसाचे शिबिर राबविण्यात येत आहे. यासाठी नवजीवन चिल्ड्रेन्स हॉस्पिटल व कमल कांती मेडिकल फाउंडेशन ट्रस्ट अँड रिसर्च सेंटर यांच्या विद्यमाने ० ते १८ वर्षे वयोगटातील बालकांसाठी हे शिबिर असून हृदयाची टू डी इको सोनोग्राफी, अद्ययावत मशिनद्वारे व तज्ञ डॉक्टरांकडून करण्यात येते. यासाठी डॉ. शितल के शहा, डॉ. संतोष जोशी, डॉ. सुनील पटवा,डॉ. सुधीर आसबे,डॉ. विनायक उत्पात,डॉ. रविराज भोसले आदींच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर संपन्न होत असून पंढरपूर शहर व तालुक्यातील ज्या बाळांना वरील प्रकारचे आजाराची लक्षणे किंवा आजार असल्यास त्यांनी २६ डिसेंबर रविवार रोजी शिबिरात आपल्या पाल्याला आणून उपचार करून घ्यावा तेही अगदी मोफत असे आवाहन डॉक्टर शितल के शहा यांनी केले आहे.