पंढरपूर देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे व सोलापूर जिल्हा कब्बडी असोसिएशन यांच्यावतीने पंढरपूर येथे दि.15 ते 17 डिसेंबर या कालावधीत साहेब करंडक 2021 या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते याचा बक्षीस वितरण समारंभ राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वरपे, मनसे नेते दिलीप धोत्रे, उद्योगपती अभिजित पाटील,यशराज साळुंखे,प्रशांत बाबर,सुहास कदम,अरुणभाऊ कोळी,अनिल अभंगराव, संजय बंदपट्टे, देवानंद गुंड पाटील,तानाजी बागल,रणजित बागल ,रमाकांत पाटील,दत्ता बागल,संतोष कवडे,संजय अभ्यंकर, सुनील पाटील,साधना राऊत,किर्ती मोरे,चारुशीला कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडला. यामध्ये पुरूष गटात स्वराज्य स्पोर्ट्स क्लब सोलापूर यांनी प्रथम तर महिला गटात जय हिंद प्रतिष्ठान मांडवे ता.माळशिरस यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. तसेच पुरूषांमध्ये द्वितीय क्रमांक श्रीराम तरूण मंडळ सोलापूर तर महिलामध्ये व्दितीय क्रमांक प्रताप क्रिडा मंडळ अकलूज ता.माळशिरस यांना मिळाला. परिक्षक म्हणून परिणीता लोंढे, प्रा.भालचंद्र देवधर, प्रा.सुनिल भोरे यांनी काम पाहिले.
यावेळी प्रस्तावित करताना श्रीकांत शिंदे म्हणाले की, आयपीएल स्पर्धेस सुरुवातीला अनेक टीका झाल्या व विरोध झाला पण आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कल्पनेतून ग्रामीण भागातील खेळाडूंना एक उत्तम प्रकारचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले अन् तेच खेळाडू उत्तमरित्या देशाच्या स्पर्धेत खेळताना आपण पाहत आहोत त्याच धर्तीवर प्रो कब्बडी सुद्धा आज लोकप्रिय खेळ झाला आहे, सोलापूर जिल्हा कब्बडी असोसिएशन व महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे वतीने आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या अन् पुढील वेळी राज्यस्तरीय होण्याऱ्या स्पर्धेचे यजमान पद आपल्या पंढरपूर शहराकडे यावे यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी करणार असून स्व.आमदार भारतनाना भालके हे पाठीशी नसल्याची उणीव त्यांना भासत असल्याचे श्रीकांत शिंदे यांनी बोलताना त्यांच्या भावना अनावर झाल्या व डोळ्यातून अश्रू बाहेर आले.
सोलापूर जिल्हा खुला गट कब्बडी निवड चाचणी स्पर्धेसाठी जयहिंद प्रतिष्ठानच्या पल्लवी वसंत साळुंखे, पूजा विठ्ठल आदलिंगे, काजल विजय गायकवाड, प्रताप क्रिडा मंडळाच्या गौरी विष्णू घाडगे, नाजमीन शेख, स्नेहल लक्ष्मण देशमुख, वैष्णवी विलास हेरकळे,साक्षी संजय इंगवले, रूक्माई स्पोटर्सच्या सोलापूरच्या मेघा गवळी, गोमलाबाई राठोड, राजवर्धन स्पोटर्स सोलापूरच्या श्रध्दा डोंबारे, एल.बी.एम.पी.सोलापूरच्या रसिका हरिदास गायकवाड, स्वराज स्पोटर्स सांगोलाच्या आरती किसन शिंदे, शिवानी शिरगीरे, अमृता घोडके यांची निवड करण्यात आली.
सदरची स्पर्धा यशस्वी होण्यासाठी तानाजी मोरे, संतोष बंडगर,दादा थिटे, सागर कदम,बालाजी कवडे, मोहम्मद वस्ताद बापू चौधरी, सुरज गंनथडे, सुरज कांबळे, सुरज पावले, आकाश नेहतराव, प्रणव गायकवाड, सागर पडगल, राकेश कदम, दत्ता जविर, बापू कदम, आकाश पवार,भैय्या फुगारे यांनी परिश्रम घेतले.